Odisha Train Accident esakal
देश

Odisha Train Accident Video : ओडिसामध्ये पुन्हा रेल्वे अपघात; ट्रेन रुळावरुन घसरली

सकाळ डिजिटल टीम

Odisha Train Accident : ओडिसामध्ये शुक्रवारी झालेल्या रेल्वे अपघातात २७५ पेक्षा जास्त लोकांचा जीव गेला आहे. या घटनेनंतर रेल्वेतील सिग्नल यंत्रणेचे वाभाडे निघत आहेत. विरोधकांनी केंद्र सरकारला धारेवर धरलं आहे. यातच आता आणखी एक रेल्वे अपघात ओडिसामध्ये झाल्याचं समोर येतंय.

ओडिसातील बारगढ जिल्ह्यामध्ये असलेल्या मेंधापाली येथे एका मालगाडीचा अपघात झाला आहे. या अपघातात रेल्वेचे पाच डबे रुळावरुन घसरले. सुदैवाने यामध्ये जीवितहानी झालेली नाही.

एएनआयने यासंबंधी एक ट्वीट केलं आहे. इस्ट कोस्ट रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार मेंझापालीजवळ एका सिमेंट फॅक्ट्रीजवळ हा अपघात झाला. मालगाडीचे काही डबे फॅक्ट्री परिसरात घसरले. यामध्ये रेल्वेचा संबंध नसल्याचं सांगण्यात आलेलं आहे.

दरम्यान, ओडिसामध्ये झालेल्या भीषण अपघातानंतर तब्बल 51 तासांनी बालासोर येथील अपघातग्रस्त भागातून पहिली ट्रेन रवाना झाली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या मालगाडीला हिरवा झेंडा दाखवला आहे. ही मालगाडी विशाखापट्टणम बंदरातून राउरकेला स्टील प्लांटकडे जात होती. तसेच, ज्या रेल्वे ट्रॅकवर शुक्रवारी भीषण अपघात झाला होता, त्याच रेल्वे ट्रॅकवरुन ही मालगाडी रवाना झाली.

रेल्वेमंत्री भाऊक

माध्यमांशी बोलताना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना अश्रू अनावर झाले. 'बेपत्ता लोकांच्या कुटुंबियांना लवकरात लवकर त्यांच्या नातलगाला भेटता यावे, हा आमचा उद्देश आहे. ते लवकरात लवकर मिळावेत. आमची जबाबदारी अजून संपलेली नाही, असं रेल्वेमंत्री म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Civic Works Halted: मतदार यादी पडताळणीमुळे पथ व भवन विभागाची कामे ठप्प; अभियंत्यांना मोहिमेतून मुक्त करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Sourav Sonawane news: 'सोनवणेंना अटक करा', घुले कुटुंबीय थेट पाण्याच्या टाकीवर चढले

Shrikant Shinde चा ताफा अडवला, काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी

Kolhapur Crime: मुलगा की मुलगी? कोल्हापुरात गर्भलिंग निदानचा पर्दाफाश, चौघे ताब्यात; ३० हजार दर

SCROLL FOR NEXT