omicron patient) sakal
देश

ओमिक्रॉन सामान्य सर्दी-खोकला नाही; केंद्र सरकारचा सतर्कतेचा इशारा

सकाळ डिजिटल टीम

सध्या देशभरात कोरोना (Corona) रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे, पुन्हा अचानक वाढत्या रुग्णसंख्येमुळे सरकारी यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. दरम्यान ओमिक्रॉन व्हेरिएंट (Omicron Variant) हा सामान्य सर्दी-खोकला नसून त्याला हलक्यात घेता येणार नाही, असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी जागरुक राहून कोरोना लसीकरण (Corona Vaccination) करून घेणे आणि कोरोना नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, दिल्ली, तामिळनाडू, कर्नाटक, उत्तर प्रदेश, केरळ आणि गुजरात या राज्यांमध्ये कोरोना रुग्णवाढीचा वेग चिंतांजणक आहे आहेत. एका पत्रकार परिषदेला बोलताना आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल म्हणाले की, भारतात कोविड-19 संसर्गामध्ये मोठी वाढ नोंदवली गेली आहे आणि 30 डिसेंबरमध्ये केस पॉझिटिव्हिटी दर 1.1 टक्क्यांवर असलेला दर बुधवारी 11.05 टक्क्यांवर गेला आहे. त्याचवेळी, कोरोनाचे रुग्ण जागतिक स्तरावर वाढत आहेत आणि 10 जानेवारी रोजी जगभरातील सर्वाधिक 31.59 लाख रुग्णांची एक दिवसीय वाढ नोंदवली गेली आहे, असे ते म्हणाले.

अधिकाऱ्याने सांगितले की, सध्या भारतातील 300 जिल्हे साप्ताहिक केस पॉझिटिव्ह रेट 5 टक्क्यांहून अधिक नोंदवत आहेत. 19 राज्यांमध्ये 10,000 हून अधिक सक्रिय कोविड प्रकरणे असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देताना अग्रवाल म्हणाले की, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, दिल्ली, तामिळनाडू, कर्नाटक, उत्तर प्रदेश, केरळ आणि गुजरात तेथे कोविड प्रकरणांमध्ये वाढ झाल्यामुळे चिंतेची राज्ये म्हणून समोर येत आहेत.

नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) व्हीके पॉल म्हणाले, ओमिक्रॉन ही सामान्य सर्दी नाही, त्याला हलक्यात घेतले जाऊ शकत नाही. आपण सतर्क राहणे, लसीकरण करणे आणि कोरोना नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. तसेच लस घेण अत्यंत महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

बुधवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार भारतात कोरोना रुग्णांच्या संख्येत तब्बल 1,94,720 नवीन रुग्णांची भर पडली, ही संख्या संख्या आता 3,60,70,510 वर पोहोचली आहे. तसेच सक्रिय रुग्णांची संख्या 9,55,319 पर्यंत वाढली आहे, 211 दिवसांतील ही वाढ सर्वाधिक वाढ आहे.

तर 442 नवीन मृत्यूंसह मृतांची संख्या 4,84,655 वर पोहोचली आहे. Omicron व्हेरिएंटच्या एकूण 4,868 प्रकरणांपैकी, 1,805 लोक आतापर्यंत बरे झाले आहेत किंवा स्थलांतरित झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway Station Renamed: महत्त्वाची बातमी! रेल्वे प्रशासनाने महाराष्ट्रातील 'या' रेल्वे स्थानकाचे नाव बदललं; कारण आलं समोर

Ambegaon News : घोडेगाव येथे दत्त जयंती निमित्त बैलगाडा शर्यत; तीन दिवसांत ५५० हून अधिक गाड्या पळणार!

Pune Crime: आधी गुंगीचं औषध देऊन पुरुषावर अत्याचार; आता दुसऱ्याला लग्नाची गळ, गुन्हा दाखल करण्याची धमकी

Dharashiv News : नॅशनल हेल्थ सिस्टीम्स रिसोर्स सेंटर मूल्यांकन पथक धाराशिव जिल्हा दौऱ्यावर; आरोग्य सेवांची गुणवत्ता उंचावण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा उपक्रम!

Uruli Kanchan Crime : दारू पिण्यास पैसे न दिल्याने रागाचा उद्रेक; बिअरची बाटली डोक्यात मारून युवक जखमी; उरुळी कांचन घटना!

SCROLL FOR NEXT