Corona vaccination for children  sakal
देश

आरोग्य मंत्रालयाकडून १८ वर्षांच्या आतील मुलांसाठी दिशानिर्देश जारी

१८ वर्षांखालील मुलांची प्रतिकारशक्ती चांगली असल्याने त्यांना तातडीने विषाणू विरोधी औषधे सुरू करण्याची आवश्यकता नाही.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत ओमिक्रॉन व्हेरियंट (Omicron Variant) मुलांसाठी धोकादायक ठरणार असल्याच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने १८ वर्षांच्या आतील मुलांसाठी संशोधित दिशानिर्देश आज जारी केले. त्यानुसार कोविडची लागण झाल्याची लक्षणे दिसली तरी मुलांना लगेचच विषाणूविरोधी किंवा मोनोक्लोनल अॅंटीबॉडी औषधे, प्रतिजैविके तसेच संप्रेरके (स्टेरॉईड) परस्पर देण्यास सुरवात करू नये, असा सल्ला पालकांना देण्यात आला आहे. पाच वर्षांच्या आतील बालकांना मास्क सक्तीचा नाही, असेही यात नमूद करण्यात आले आहे.

अन्य देशांच्या तुलनेत भारतीयांना ओमिक्रॉनचा गंभीर धोका पोहोचत नसल्याचे आढळले असले तरी सध्याच्या तिसऱ्या लाटेत प्रत्येकाने सावधगिरी व आरोग्य नियमांचे काटेकोर पालन सुरू ठेवणे अत्यावश्यक असल्याचे यात म्हटले आहे. या दिशानिर्देशानुसार, १८ वर्षांखालील मुलांची प्रतिकारशक्ती चांगली असल्याने त्यांना तातडीने विषाणू विरोधी औषधे सुरू करण्याची आवश्यकता नाही.

इतर दिशानिर्देशांनुसार, हलकी लक्षणे असलेल्या रुग्णांना प्रतिजैविके देऊ नयेत. मध्यम व गंभीर लक्षणे असली तरी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय व कोरोनाचे ठोस निदान झाल्याशिवाय प्रतिजैविकांचा वापर टाळावा. प्रौढ कोरोनाग्रस्तांसाठी स्टेरॉईडसचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच करावा. सौम्य लक्षणे असलेल्यांना ती अजिबात देऊ नयेत.

स्टेरॉइडचा वापर मर्यादित प्रमाणात व ठराविक कालावधीसाठीच करावा. गंभीर लक्षणे असलेल्या कोरोनाग्रस्तांना संप्रेरके देताना डेक्सामेथासोन ०.१५ मिलीग्रॅम (दिवसभरात ६ मिलीग्रॅम), मेथिलप्रेडनिसोलोन ०.७५ मिलीग्रॅम हे प्रमाण पाळावे. लक्षणे दिसल्यावर पहिल्या ३ ते ५ दिवसांत स्टेरॉईड सुरू करण्याचे टाळावे. रक्त गोठविणाऱ्या प्रतिजैविकांचा अतिवापर टाळावा, अशी डॉक्टरांना सूचना करण्यात आली आहे.

मुलांसाठी नवे दिशानिर्देश

  • कोरोनाची लक्षणे आढळली तरी लगेच प्रतिजैविकांचा वापर नको

  • स्टेरॉईडची मात्राही १० ते १४ दिवसांत कमी करावी

  • अँटीकॉगुलंट औषधाचा वापर टाळावा

  • हलकी लक्षणे आढळलेल्या मुलांची डॉक्टरांकडे नेऊन तपासणी करावी

  • संसर्गमुक्त झाल्यानंतरही नियमित तपासणी करावी

मास्कसाठीचे दिशानिर्देश

  • पाच वर्षांच्या आतील बालकांना सक्तीने मास्क लावू नये

  • सहा ते ११ वयोगटातील मुलांसाठी त्यांचे आईवडील किंवा पालकांच्या देखरेखीखालीच मास्कचा सुरक्षितपणे वापर करावा

  • १२ वर्षांपुढील मुलांसाठी प्रौढांप्रमाणेच मास्क वापरणे आवश्यक.

  • मास्क वापरण्यापूर्वी व तो हाताळताना साबण किंवा अल्कोहोल आधारित हॅंडवॉशने हात साफ करणे गरजेचे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT