PM modi yoga google
देश

आंतरराष्ट्रीय योग दिनी ७५ मंत्री ७५ ठिकाणी करणार योगासने

गृहमंत्री अमित शाह नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात योगासने करणार आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे तमिळनाडूमधील कोइम्बतूर येथील कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

नमिता धुरी

मुंबई : दरवर्षी २१ जूनला आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो. यावर्षी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह ७५ मंत्री देशाच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक स्थळांवर योगासने करणार आहेत. पंतप्रधान मोदी कर्नाटकच्या मैसूर पॅलेसमध्ये योगासने करणार आहेत.

गृहमंत्री अमित शाह नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात योगासने करणार आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे तमिळनाडूमधील कोइम्बतूर येथील कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर हे दिल्लीच्या लोटस टेम्पल येथे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपूरच्या झिरो माइल स्टोन येथे अर्थमंत्री निर्मला सितारामन दिल्लीच्या जंतर-मंतर येथे योगासने करणार आहेत.

धर्मेंद्र प्रधान हिमाचलच्या कांगडा किल्ला येथे, अनुराग ठाकूर हिमाचलच्या नालगढ किल्ला येथे, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी लखनऊ येथे, भूपेंद्र यादव अयोध्या येथे, नरेंद्र सिंह तोमर मध्यप्रदेशातील खजुराहो येथे, अर्जुन मुंडा झारखंड येथील रांची येथे, पीयूष गोयल मुंबईच्या मरिन ड्राइव्ह येथे, प्रल्हाद जोशी कर्नाटकच्या हंपी येथे, नारायण राणे पुणे येथे योगासने करणार आहेत. देशभरातील नागरिकांनी योगाभ्यासाला आपल्या दिनक्रमात समाविष्ट करावे, असे आवाहन मोदींनी केले आहे.

आंतरराष्ट्रीय योग दिवसाचा इतिहास :

२७ सप्टेंबर २०१४ रोजी UN जनरल असेंब्ली (UNGA) मधील भाषणादरम्यान पंतप्रधान मोदींनी आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना सर्वप्रथम मांडली होती. ११ डिसेंबर २०१४ रोजी संयुक्त राष्ट्र महासभेने जाहीर केले की २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिवस किंवा जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जाईल. २०१५ पासून, जगभरात २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Varinder Singh Ghuman : धक्कादायक! जगातील पहिला शाकाहारी ‘प्रोफेशनल बॉडीबिल्डर‘ वरिंदर सिंह घुमनचा ‘हार्ट अटॅक’ने मृत्यू

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगासाठी 'ही' तारीख महत्त्वाची; कर्मचाऱ्यांना होणार दुप्पट फायदा

Latest Marathi News Live Update: कुस्तीपटू शालेय विद्यार्थ्याचा विवस्त्र व्हिडिओ व्हायरल

INDW vs SAW: भारताची 'संकटमोचक' ऋचा घोषचं शतक ६ धावांनी हुकलं, पण नावावर झाले ३ मोठे विक्रम

Israel announces Gaza ceasefire : ‘’२४ तासांच्या आत गाझामध्ये युद्धबंदी’’ ; अखेर इस्रायलने केली मोठी घोषणा!

SCROLL FOR NEXT