Prashant Kishor Team eSakal
देश

प्रशांत किशोरांच्या प्रस्तावावर काँग्रेस 72 तासांत अहवाल सादर करणार

पक्षातर्फे प्रशांत किशोर यांच्या प्रस्तावांचे मूल्यांकन केले जात आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : काँग्रेसच्या पक्षाध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी संघटना मजबूत करण्यासाठी उपाययोजना सुचवण्यासाठी आणि पुढील निवडणुकीच्या तयारीसाठी स्थापन केलेली काँग्रेस नेत्यांची विशेष समिती येत्या दोन-तीन दिवसांत आपला अहवाल सादर करणार आहे. निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी आज काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी चर्चेची दुसरी फेरी पार पडली. (Prashant Kishor Proposal To Congress )

बैठकीनंतर पक्षाचे प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला म्हणाले की, पक्षातर्फे प्रशांत किशोर यांच्या प्रस्तावांचे मूल्यांकन केले जात आहे. तसेच अन्य गोष्टींवरही विचार केला जात असून, याबाबतचा अंतिम अहवाल येत्या 72 तासांत काँग्रेस अध्यक्षांना सादर केला जाईल असे सिंह म्हणाले. समितीने बुधवारी काँग्रेसशासित राजस्थान आणि छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी पक्षाची निवडणूक रणनीती विकसित करण्याबाबत चर्चा केली.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनीही सोनिया गांधींची येथे भेट घेतली आणि आगामी विधानसभा आणि सार्वत्रिक निवडणुकांसाठी संघटनेच्या रणनीतीवर चर्चा केली. अनेक तास चाललेल्या बैठकीदरम्यान, दोन्ही मुख्यमंत्र्यांनी संबंधित राज्यांसाठी त्यांच्या निवडणूक योजनांवर चर्चा केली आणि किशोर यांना तेथे लागू करण्यासाठी त्यांच्या अतिरिक्त सूचना देण्यास सांगितल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Cabinet Reshuffle : १२ मंत्र्यांना हटवले होते; मोदी सरकारचा शेवटचा मंत्रिमंडळ फेरबदल कधी झाला होता? आता दिग्गजांची गच्छंती?

Latest Marathi News Live Update : पावसाने मुंबईकरांचे हाल, वेस्टर्न एक्सप्रेस वेवर प्रचंड वाहतूक कोंडी

'हेरा फेरी 3'ला मोठा धक्का? दिग्दर्शनाबाबत निर्मात्यांचा मोठा खुलासा

Fifa World Cup: किलियन एम्बापेचा जलवा... Golden Boot च्या शर्यतीत मेस्सीला मागे टाकले; फ्रान्स, नॉर्वे अन् मेक्सिको Round of 16 मध्ये

IND vs ENG 1st T20I: वैभव सूर्यवंशीची सोशल मीडियावर हवा! श्रेयस अय्यर म्हणतो, मला ती दिसत नाही, कारण...; विधानाची जोरदार चर्चा

SCROLL FOR NEXT