Bihar-Hajipur Google photo
देश

HDFC बँकेत दिवसाढवळ्या दरोडा; चार मिनिटांत लुटले १.१९ कोटी!

गुरुवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास बँक उघडताच दरोडेखोरांनी बँकेत प्रवेश केला. आणि हातातील शस्त्रांच्या आधारे कर्मचाऱ्यांना धमकावले. काही जणांनी सोबत आणलेल्या पोत्यांमध्ये पैसे भरण्यास सुरवात केली.

वृत्तसंस्था

गुरुवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास बँक उघडताच दरोडेखोरांनी बँकेत प्रवेश केला. आणि हातातील शस्त्रांच्या आधारे कर्मचाऱ्यांना धमकावले. काही जणांनी सोबत आणलेल्या पोत्यांमध्ये पैसे भरण्यास सुरवात केली.

हाजीपूर : बिहारमधील वैशाली जिल्ह्यातील हाजीपूरमध्ये गुरुवारी एका बँकेवर दरोडा टाकण्यात आल. पाच दरोडेखोरांनी बँकेतून १.१९ कोटी रुपये पळवले. हाजीपूरच्या कर्णपुरा भागातील एचडीएफसी बँकेच्या शाखेत सकाळी ही घटना घडली. दुचाकीवरून आलेले पाच दरोडेखोर चार मिनिटात हा कारनामा करून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी हाजीपूरमध्ये नाकाबंदी केली. केंद्रीय गृह राज्य मंत्री नित्यानंद राय यांच्या घराजवळच ही बँक आहे. हाजीपूरचे एसपी राघव दयाळ यांच्यासमवेत अनेक वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी जमा झाले होते. परिसरातील सीसीटीव्हींच्या आधारे दरोडेखोरांचा माग काढला जात आहे. (one crore rupees looted from HDFC bank in Hajipur Bihar)

गुरुवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास बँक उघडताच दरोडेखोरांनी बँकेत प्रवेश केला. आणि हातातील शस्त्रांच्या आधारे कर्मचाऱ्यांना धमकावले. काही जणांनी सोबत आणलेल्या पोत्यांमध्ये पैसे भरण्यास सुरवात केली. चार मिनिटात १ कोटी १९ लाख रुपयांची रोकड घेऊन फरार झाले. दरोडेखोर बाहेर पडताच बँक कर्मचाऱ्यांनी पोलिसांनी फोनवरून घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर एसपी सहित पोलिसांची मोठी टीम बँकेच्या शाखेवर पोहोचली. आसपासच्या जिल्ह्यांमध्ये अलर्ट देण्यात आला असून नाकाबंदीही करण्यात आली आहे.

बँकेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाच दरोडेखोर बँकेतून बाहेर पडताना दिसत आहेत. त्यापैकी एकाच्या हातात पैशांनी भरलेले पांढऱ्या रंगाचे पोते दिसत आहे. बिहारमध्ये नुकतेच लॉकडाउनचे निर्बंध काही प्रमाणात हटविण्यात आले आहेत. त्यात ही घटना समोर आली आहे. ज्यानंतर पोलिसांनी वाहनांची तपासणी सुरू केली आहे. चार महिन्यांपूर्वी सहा-सात जणांच्या टोळीने अॅक्सिस बँकेतून ४३ लाख रुपयांची लूट केली होती. अॅक्सिस बँक आणि गुरुवारी लुटलेली एचडीएफसी बँक यामधील अंतर तीन किलोमीटर आहे. दरोडेखोरांना लवकर अटक केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

(Edited by : Ashish N. Kadam)

देशभरातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS U19: ज्युनियर सेहवाग अर्धशतकापासून हुकला, अन्वय द्रविड्हचीही बॅट शांत; यशवर्धन चौहानने मात्र ऑस्ट्रेलियाविरुद्ध ठोकलं शतक

Walchandnagar News : बुलेटच्या सायलेन्सर वरुन फिरविला रोलर....; पोलिसांनी बुलेटचा फट् -फट् आवाज केला बंद...

Tata Chairman Salary: Tata Sons च्या चेअरमनला किती पगार मिळतो? नोएल टाटांच्या विरोधानंतर पद पुन्हा चर्चेत; आकडा पाहून धक्का बसेल!

Akola News : जिल्हाधिकाऱ्यांनी सोडले शेतकऱ्यांना वाऱ्यावर; महाबीज प्रशासनाकडून माहिती देण्यास नकार, एमडींनीही केले हात वर

Ai+ Nova 2 Power 5G भारतात लाँच! 16,999 रुपयांत खरेदीची संधी...पाहा फीचर्स अन् ऑफर्स!

SCROLL FOR NEXT