Tea 
देश

चहाच्या एका कपाची किंमत 1 हजार रुपये, इतका महाग का?

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - अनेकांच्या दिवसाची सुरुवात ही चहाशिवाय होत नाही. चहा पिणाऱ्यांसाठी तर वेळ काळ नसते. आज 21 मे जागतिक चहा दिन (World Tea Day) आहे. चहाची किंमत किती असू शकते? नॉर्मली एका कटिंगसाठी 5 ते दहा रुपये मोजले जातात. यापेक्षा महाग म्हटलं तर आपण फार तर दोन अडीचशे रुपयांची कल्पना करू. पण असाही चहा आहे ज्याच्या एका कपासाठी हजार रुपये खर्च करावे लागू शकतात. कोलकात्यातील मुकंदरपूरमध्ये एक चहाचं दुकान आहे जिथं सर्वात महागडा चहा मिळतो. 

इतका महाग चहा कसा असा प्रश्न नक्कीच पडला असेल. या दुकानामध्ये जवळपास 100 प्रकारचा चहा मिळतो. या चहाची किंमत 10 रुपयांपासून ते 1 हजार रुपयांपर्यंत आहे. सर्वसामान्य चहाशिवाय इथं लवेंडर टी, ओकेटी टी, वाइन टी, तुलसी जिंजर टी, हिबिस्कस टी, तीस्ता व्हॅली टी यासारखे वेगवेगळे चहा मिळतात. 

दुकानाचे मालक पार्थ प्रातिम गांगुली यांनी सांगितलं की, सुरुवातीला ते नोकरी करायचे. पण एकेदिवशी त्यांनी नोकरीला राम राम केला आणि चहाचं दुकान सुरु केलं. 2014 मध्ये चहाचं लहानसं दुकान उघडलं आणि गेल्या 6 ते 7 वर्षात या दुकानाला ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. सर्वात महाग असलेल्या चहाचं नाव Bo Lay असं आहे. याच्या एक किलोग्राम चहा पावडरची किंमत तब्बल तीन लाख रुपये इतकी आहे. यामुळेच एक कप चहा 1 हजार रुपयांना मिळतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर तोडगा निघाला! बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे; महायुती सरकारने मान्य केल्या प्रमुख मागण्या, वेतनवाढ आणि ग्रॅच्युइटीवर निर्णय

T20 WC, IND W vs SA W: भारताचे सेमीफायनलचे गणित मारिझान कापच्या 'वन वुमन शो'मुळे बिघडले! दक्षिण आफ्रिकने मँचेस्टरमध्ये दिली मात

Khadakwasla Rain Update: खडकवासला धरण परिसरात तासाभरात ३० मिमी पाऊस; पाणीसाठ्यात वाढ नाही, रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी

Sangli Crime Twist: वेदांत बंडगर खून प्रकरणाला नवे वळण; कुख्यात गुंड म्हमद्या नदाफ अटकेत, पोलिस कोठडीचे अधिकार राखून कारागृहात रवानगी

Paithan Road Crash : पैठण तालुक्यात भीषण अपघात; भरधाव पिकअपच्या धडकेत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, दोन बालकांची प्रकृती गंभीर

SCROLL FOR NEXT