Madhya Pradesh Kuno National Park esakal
देश

PM मोदींच्या वाढदिनी नामिबियातून आणलेल्या आणखी एका चित्त्याचा मृत्यू; आतापर्यंत 7 चित्त्यांनी गमावला जीव

मध्य प्रदेशातील कुनो अभयारण्यात (Madhya Pradesh Kuno Sanctuary) आणखी एका चित्त्याचा (Cheetah) मृत्यू झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने कुनो राष्ट्रीय उद्यानात नामिबियातून चित्ते आणले होते.

मध्य प्रदेशातील कुनो अभयारण्यात (Madhya Pradesh Kuno Sanctuary) आणखी एका चित्त्याचा (Cheetah) मृत्यू झाला आहे. गेल्या तीन महिन्यात 7 चित्त्यांचा इथं मृत्यू झाला आहे.

कुनो अभयारण्यात काल सायंकाळी 4 वर्षांच्या तेजस नावाच्या चित्त्याचा मृत्यू झाला. चित्त्याच्या मानेवर काही जखमा आढळल्या होत्या. त्यावर उपचार करण्यापूर्वीच चित्ता मृत अवस्थेत आढळून आला.

आतापर्यंत कुनो अभयारण्यात (Kuno National Park) 7 चित्त्यांचा मृत्यू झाला आहे. वारंवार चित्त्यांच्या मृत्यूच्या घटना घडत असल्यामुळं अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मध्य प्रदेशातील कुनो अभयारण्यात आतापर्यंत 7 चित्त्यांचा मृत्यू झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

कोट्यवधी खर्च करुन आफ्रिकेतील नामिबियातून हे चित्ते आणण्यात आले आहेत. मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने कुनो राष्ट्रीय उद्यानात नामिबियातून चित्ते आणले होते. आतापर्यंत कुनो अभयारण्यात 20 चित्ते आणण्यात आले होते. यातील चार चित्त्यासह तीन बछड्यांचा मृत्यू झाला आहे.

सर्वात पहिल्यांदा ‘साशा’ या मादी चित्त्याचा 27 मार्च रोजी मूत्रपिंडाच्या आजाराने मृत्यू झालेला. तर, ‘उदय’ हा चित्ता 23 एप्रिलला निश्चल अवस्थेत आढळून आला होता. नंतर त्याचाही मृत्यू झाला. ‘दक्षा’ या मादीचा 9 मे रोजी चित्त्यांच्या झुजीनंतर मृत्यू झाला होता. आता तेजस नावाच्या चित्त्याचाही मृत्यू झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Deccan Queen Heritage Coach : मुंबई-पुणे 'डेक्कन क्वीन' नव्या हेरिटेज लूकमध्ये; चहा, नाष्टा, डायनिंग ट्रेनचा अनुभव खतरनाक

'तू का आला नाहीस?' असं म्हणत न जन्मलेल्या बाळाला पत्रं लिहायच्या ओम पुरी यांच्या पहिल्या पत्नी, बसलेला मानसिक धक्का

Latest Marathi News Update : सिडकोच्या घराची प्रतीक्षा सोडतीची

Oman Coast Incident : ओमान किनाऱ्याजवळ व्यापारी जहाजावर मोठा हल्ला, १० भारतीयांना वाचवण्यात यश, एक जण बेपत्ता

Mumbai Pune Journey : कोण कोणाच्या गळाला लागणार? विश्वजित कदमांची भाजपसोबतची जवळीक पुन्हा चर्चेत; मुख्यमंत्र्यांसोबतच्या मुंबई ते पुणे प्रवासाने रंगल्या चर्चा

SCROLL FOR NEXT