One-Nation-One-Card 
देश

‘वन नेशन, वन कार्ड’ उद्यापासून प्रत्यक्षात

सकाळन्यूजनेटवर्क

सर्व सेवांसाठी एकच कार्ड शक्य
नवी दिल्ली - वॉलेटमध्ये वेगवेगळी कार्डे वापरणे सर्वांसाठीच मोठे जिकरीचे असते, बऱ्याचदा हे ओझे वाहताना ते हरवण्याचाही धोका असतो. आता या समस्येवर नवा तोडगा मिळणार आहे आणखी ४८ तासांनी अस्तित्वात येणारे ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ हा त्यावरील प्रभावी उपाय ठरू शकतो. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

डेबिट व क्रेडिट कार्डाच्या लिंकच्या साहाय्याने वापरता येणारे हे कार्ड एटीएमसह रेल्वे, मेट्रो, शॉपिंग मॉल टोल नाके व बस सेवेसह अन्य अनेक सेवांसाठी वापरले जाऊ शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी (२८ डिसेंबर) या योजनेला प्रारंभ होईल याच कार्यक्रमात ते दिल्लीतील पहिल्या विनाचालक मेट्रोलाही हिरवा झेंडा दाखवतील.

भारत इलेक्‍ट्रॉनिक्‍स लिमिटेडने ‘ऑटोमॅटिक फेयर कलेक्‍शन सिस्टिम (स्वागत) च्या सहकार्याने हे ‘वन नेशन, वन कार्ड’ अस्तित्वात आणले आहे.  अनेक बॅंकांनीही याप्रकारची कार्डे देण्यास सुरवात झाली आहे. आपल्या बॅंकेशी किंवा पेटीएम पेमेंट बॅंकेशी संपर्क साधल्यास हे कार्ड मिळू शकेल. ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’द्वारे नॅशनल कॉमन मोबिलिटी कोडच्या साहाय्याने तुम्हाला आर्थिक व्यवहार करता येतील. हे एकच कार्ड देशातील कोणत्याही शहरातील मेट्रोसाठी चालणार असल्याने त्या- त्या ठिकाणी वेगवेगळी कार्डे-टोकन घेण्याची डोकेदुखी थांबणार आहे.

असा होईल उपयोग
तुम्ही या कार्डाच्या साहाय्याने थेट मेट्रोत प्रवेश करू शकाल व स्थानकातून बाहेर पडतानाच तुमच्या प्रवासाची रक्कम या कार्डातून परस्पर वळती होईल. टोल नाक्‍यांवरही हीच सुविधा मिळेल. एटीएम कार्ड म्हणून याचा वापर केला तर ५ टक्के आणि विदेश प्रवासासाठी ते वापरल्यास १० टक्के कॅशबॅकची सुविधा मिळेल. तुमच्या बॅंक खात्यात पुरेशी गंगाजळी असेल तर या कार्डाद्वारे एटीएममधूनही तुम्ही पैसे काढू शकाल. रूपे कार्डाची जोड दिल्यास ते क्रेडिट कार्ड म्हणूनही वापरता येईल.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest: पेपर लीकविरोधात 'कॉकरोच जनता पार्टी'चा एल्गार! आंदोलनासाठी परवानगी कशी मिळते? जाणून घ्या प्रक्रिया

Diesel Selling : कॅनमध्ये डिझेल विक्रीला बंदी; व्यावसायिकांसह वाहनचालकांची गैरसोय

Bhor News : माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचे निधन

Hero HF Deluxe : पेट्रोलची चिंता संपणार? नितीन गडकरींची मोठी भेट; भारतात पहिल्या Flex Fuel बाईकची एन्ट्री, किंमत 72 हजारपासून सुरू

Kolhapur Accident: कोल्हापुरात भीषण अपघात! एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT