crime sakal
देश

भीषण! नवविवाहितेच्या हत्येच्या संशय, तरूणाला रॉकेल ओतून जाळलं

सकाळ डिजिटल टीम

गुवाहाटी : आसाममध्ये एक धक्कादायक घटना समोर आली असून रॉकेल ओतून एका व्यक्तीला जिवंत जाळण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे त्यांनंतर त्या व्यक्तीचा मृतदेह पुरण्यात आला. त्या व्यक्तीवर नवविवाहितेचा खून केल्याचा आरोप होता. गावातील लोकांनी कोर्ट भरवून त्याला शिक्षा सुनावली, त्यानंतर त्याला जाळण्यात आलं. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी दफन केलेला मृतदेह बाहेर काढला. दरम्यान पीडीत व्यक्तीचा मृतदेह ९० टक्के जळाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

बोर लालुंग गावातील रहिवासी रणजीत बोरदोलोई असे पीडितेचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परिसरातील एका महिलेच्या कथित हत्येप्रकरणी या व्यक्तीला जाळण्यात आले होते. पोलिसांनी सांगितले की, हा मृतदेह मॅजिस्ट्रेटच्या देखरेखीखाली जमिनीतून काढण्यात आला. मृतदेह ९० टक्के जळालेल्या अवस्थेत सापडला.

जिवंत जाळण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव रणजित बोरदोलाई असे आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी (एसडीपीओ) एम. दास यांनी सांगितले की, आम्हाला संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास जनसुनावणीदरम्यान एका व्यक्तीला जिवंत जाळल्याची माहिती मिळाली होती. त्याच्यावर खुनाचा आरोप होता. जाळल्यानंतर त्याचा मृतदेह जमिनीत गाडण्यात आला. यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह जमिनीतून बाहेर काढला. दास यांच्या म्हणण्यानुसार या प्रकरणी काही लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे.

आसाममधील नौगाव जिल्ह्यात ही खळबळजनक घटना घडली आहे. येथील बोर लालुंग परिसरात झालेल्या जनता न्यायालयात जिवंत जाळण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव रणजित बोरदोलाई असे आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी (एसडीपीओ) एम. दास यांनी सांगितले की, आम्हाला संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास जनसुनावणीदरम्यान एका व्यक्तीला जिवंत जाळल्याची माहिती मिळाली होती. त्याच्यावर खुनाचा आरोप होता. जाळल्यानंतर त्याचा मृतदेह जमिनीत गाडण्यात आला. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहचले आणि मृतदेह जमिनीतून बाहेर काढला.

नौगाव या गावात झालेला हा प्रकार भिषण आहे, गावातील एका व्यक्तीने सांगितले की, तीन दिवसांपूर्वी या परिसरात एका महिलेचा मृतदेह सापडला होता. त्याचे नुकतेच लग्न झाले होते. त्याची हत्या करून त्याचा मृतदेह गावातील तलावात फेकून दिला. त्या व्यक्तीने दावा केला की गावातील काही महिलांनी एका वृद्ध महिलेला सांगतांना ऐकले होते की त्याने नवविवाहितेचा खून केला. यानंतर ग्रामस्थांची बैठक झाली. यामध्ये वृद्ध महिलेला बोलावण्यात आले. चौकशीत तिने पाच जणांनी मिळून नवविवाहितेची हत्या केल्याची कबुली दिली. यामध्ये रणजित बोरदोलोईने तिचा गळा आवळून खून केला.

या जनसुनावणीदरम्यान वृद्ध महिलेने केलेला हा खुलासा ऐकून रणजितला बैठकीत बोलावण्यात आले. रणजीतने तेथील सर्वांसमोर आपला गुन्हा कबूल केल्याचा दावा तरुणाने केला. त्यामुळे तेथे उपस्थित असलेल्या काही लोकांनी त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. दरम्यान, काही लोकांनी त्याच्यावर रॉकेल ओतून पेटवून दिले. नंतर त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT