Koffee With Karan 7: साराचं सिक्रेट व्हायरल! अभिनेत्री करणवर नाराज

बॉलीवूडचा प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर हा आता त्याच्या कॉफी विथ करण नावाच्या शो मुळे चर्चेत आला आहे.
karan johar news
karan johar news esakal

Koffee With Karan 7: बॉलीवूडचा प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर हा आता त्याच्या कॉफी विथ करण नावाच्या शो मुळे चर्चेत आला आहे. गेल्या काही (bollywood news) वर्षांपासून करणचा हा शो वेगवेगळ्या वादग्रस्त प्रतिक्रियेमुळे तो शो नेहमीच ट्रेंडिंगचा विषय असल्याचे दिसून आले आहे. काही दिवसांपूर्वी त्याच्या त्या शो मध्ये रणवीर सिंग आला होता. त्यावेळी त्यानं दीपिकाबद्दल (ranveer singh) केलेल्या बोल्ड विधानामुळे करणच्या शोचा टीआरपी मोठ्या प्रमाणात वाढला होता. आताही करणनं केवळ त्याच्या नव्या शोच्या लोकप्रियतेसाठी केलेलं विधान चर्चेत आलं आहे.

करणनं प्रख्यात अभिनेत्री सारा अली खानवर टीका केली आहे. तिच्यावर टीका करुन कॉफी विथ करणचा टीआरपी वाढवणं यावर त्याचा भर असल्याचे (Koffee With Karan season 7) नेटकऱ्यांनी म्हटले आहे. करण हा सध्या त्याच्या कॉफी विथ करणच्या सातव्या सीझनच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असल्याचे दिसून आले आहे. यावेळी त्यानं कार्तिक आर्यनं आणि सारा अली खान यांच्या लव स्टोरीवर भाष्य केलं आहे. त्याचं ते वक्तव्य मात्र साराला काही आवडलेलं नाही. तिनं करणवर नाराजी व्यक्त केली आहे.

साराची करणच्या त्या वक्तव्यावर प्रतिक्रिया आली असून ती त्याच्यावर नाराज असल्याचे दिसून आले आहे. बॉलीवूड लाईफनं याविषयी अधिक माहिती दिली आहे. करणनं आपली लवस्टोरी सोशलाईज केल्याचा राग साराला आल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे तिनं करणवर नाराजी व्यक्त केली आहे. साराला असे वाटते की, लोकांनी तिला तिच्या अभिनयामुळे ओळखावे. सध्या कोणत्याही प्रकरणामध्ये अडकून स्वताची प्रतिमा मलीन करण्याचा तिचा विचार नसल्याचे सांगण्यात आले आहे.

karan johar news
Koffee With Karan: होतील आणखी अनेक खुलासे !

सारा ही भलेही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणारी सेलिब्रेटी असेल मात्र ती तिच्या वैयक्तिक गोष्टी फारशा प्रमाणात शेयर करत नसल्याचेही दिसून आले आहे. करणनं केलेल्या वक्तव्याचा परिणाम तिच्या कामावर होण्याची शक्यता असून प्रेक्षक तिला तिच्या पर्सनल लाईफवरुन डिवचण्यास सुरुवात करतील. अशी भीती साराला आहे.

karan johar news
Koffee With Karan 7:आलियाचं लग्न पण वडील महेश भट्ट रागावलेले, करणचा खुलासा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com