Wife Swapping Case e sakal
देश

शारीरिक संबंधासाठी स्वतःच्याच पत्नीवर बोली, टेलिग्राम-मेसेंजरचा वापर

सकाळ डिजिटल टीम

तिरुवनंतरपुरम : शारीरिक संबंधासाठी जोडीदाराची अदलाबदली करत असलेल्या एका रॅकेटचा (Wife Swapping Case) केरळ पोलिसांनी (Kerala Police) पर्दाफाश केला होता. याचप्रकरणी आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपी शारीरिक संबंधांसाठी जोडीदाराची बोली लावायचे. तसेच अनैसर्गिक संबंध देखील ठेवले जात होते. याप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. येत्या काही दिवसांत आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे.

शारीरिक संबंधासाठी पत्नीची बोली -

शारीरिक संबंधांसाठी पत्नीची अदलाबदली (Wife Swapping Case) करणाऱ्या या रॅकेटचा सोशल मीडियावर एक सक्रीय ग्रुप आहे. यामध्ये जवळपास ५ हजार जोडपे सहभागी आहेत. तसेच आतापर्यंत अटक करण्यात आलेले आरोपी हे या धंद्यात २०१८ पासून सक्रीय आहेत. एक २६ वर्षीय महिला तिच्या पतीच्या म्हणण्यानुसार दोन वर्षांपूर्वी या रॅकेटमध्ये सहभागी झाली होती. यावेळी तिचा पती तिला दुसऱ्या पुरुषांसोबत शारीरिक संबंध ठेवायला भाग पाडायचा. तसेच त्यांच्याकडून पैसे आकारायचा. इतकेच नाहीतर तिचा पती देखील इतर महिलांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी बोली लावायचा. पण, हे सर्व असह्य झाल्यानंतर या महिलेने पोलिसांत धाव घेतली. त्यानंतर पोलिसांना सहा आरोपींना अटक केली आहे. याबाबत स्थानिक माध्यमांनी वृत्त दिलं आहे.

असा झाला भंडाफोड -

दुसऱ्या महिलेने कोट्ट्यम जिल्ह्यातील आपल्या पतीविरोधात तक्रार केली होती. तिचा पती तिला दुसऱ्या पुरुषासोबत बळजबरीने शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडत होता. तसेच तो अनैसर्गिक संबंध देखील ठेवायचा, अशी तक्रार महिलेनं केली होती. त्यानंतर पोलिसांनी सायबर सेलच्या मदतीने आरोपींचा शोध घेतला. पोलिसांनी याप्रकरणी अधिक चौकशी केली असून करुकाचल भागात अशा अनेक घटना घडल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी तक्रार करणाऱ्या महिलेच्या पतीला अटक केली. त्याची चौकशी केली असता या रॅकेटचा भंडाफोड झाला. अल्लपुझा, एर्नाकुलम जिल्ह्यातूनही काही आरोपींना अटक करण्यात आली.

टेलिग्राम, मेसेंजरवरून फोटो करायचे शेअर -

सेक्सरॅकेटमध्ये एक गट सक्रीय असून ते सोशल मीडियाचा वापर करून हा धंदा करत असल्याचे उघडकीस आले. या ग्रुपने सोशल नेटवर्कींग साइट्सचा वापर करून राज्यभरात जाळे पसरवले आहे. सुरुवातीला ते टेलिग्राम आणि मेसेंजर ग्रुपमध्ये सामील होतात. अशा प्रकारे ते एकमेकांशी जोडले जातात. सोशल मीडियावर असलेल्या ग्रुपमध्ये जोडीदारांचे फोटो शेअर करत होते. त्यानंतर सर्व सदस्यांची बैठक घेत होते. काही आरोपी पत्नीला दुसऱ्यासोबत बळजबरीनं शारीरिक संबंध ठेवायला लावत होते आणि त्यांच्याकडून पैसे आकारायचे. या रॅकेटमध्ये अनेक उच्चभ्रू लोकांचा सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे. तसेच परराज्यात देखील हा ग्रुप सक्रीय आहे. हे आरोपी सुट्टींच्या दिवसात एखाद्या पर्यटन स्थळी किंवा रिसोर्टवर भेटायचे, असं पोलिस अधिकारी श्रीकुमार यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Odisha Tragedy : ओडिशात मोठी दुर्घटना ! रुग्णालयाला भीषण आग; ICU मधील १० रुग्णांचा गुदमरुन मृत्यू

Dubai Airport Drone Attack : दुबई विमानतळावर इराणचा ड्रोन हल्ला ! आकाशात धुराचे लोट, विमानसेवा विस्कळीत

Sambhajinagar Hostel Mess 'Mess': CIPET वसतिगृहात धक्कादायक प्रकार: विद्यार्थ्यांच्या जेवणात अळ्या-मुंगळे; महिनाभरात दहा वेळा घटना

Sambhajinagar News: शहीद सैनिकांच्या मुलांसाठी आनंदाची बातमी: MGM विद्यापीठात 100% मोफत शिक्षणासाठी भारतीय सैन्यदलासोबत करार

Sambhajinagar LPG News: गॅस तुटवड्यावर ‘सकाळ’चा दणका: बुढीलेनमध्ये हॉटेलवर छापा, घरगुती तीन सिलिंडर जप्त

SCROLL FOR NEXT