Sharad-Pawar
Sharad-Pawar 
देश

फक्त विदूषकाची कमतरता आहे - शरद पवार

सकाळन्यूजनेटवर्क

श्रीवर्धन - राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार सर्कस असेल तर त्यात विदूषकाची कमतरता आहे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना लगावला. सध्या पवार हे चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी दोन दिवसांच्या कोकण दौऱ्यावर आहेत. पवारांनी आज रायगडमधील नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली. श्रीवर्धन येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

राज्यात सत्तेत असणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा उल्लेख सर्कस म्हणून करणाऱ्या केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना शरद पवार यांनीच आज सडेतोड उत्तर दिले. ‘‘आमच्या सर्कसमध्ये प्राणी आहेत, पण, विदूषकाची मात्र कमतरता आहे,’’ असे पवार यांनी नमूद केले.

राजनाथ सिंह यांनी व्हर्च्युअल रॅलीद्वारे महाराष्ट्रातील भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता, त्यावेळी त्यांनी महाराष्ट्रात सध्या सत्तेत असणाऱ्या महाविकास आघाडीच्या कारभारावर निशाणा साधला होता. पवार यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावरही टीका केली. ‘‘ पवार यांना उशिरा जाग आली, आमचे नेते कोकणात याआधीच पोहोचले आहेत.’’ असे विधान चंद्रकांत पाटील यांनी केले होते. यावर शरद पवार म्हणाले, ‘‘ बरं झाले भाजप नेत्यांनी इथे येऊन लोकांचे संसार उभे केले, पडलेली घरे बांधली, फळबागा पुन्हा लावल्या, त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो.’’

काश्मिरमधील फोटो पत्रकारिता: जेव्हा एक फोटो हजारो शब्द बोलून जातो...

वेगळ्या पॅकेजची गरज
कोकणातील फळबाग शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नारळ, काजू , आंबा, सुपारी या फळबागा येथे आहेत. नारळ, सुपारीची पिके उद्ध्वस्त झाली आहेत. उद्ध्वस्त झालेल्या नारळ बागा पुन्हा उभ्या राहायला पुढची दहा वर्षे जातील. शेती पूर्ववत करायला मोठा खर्च करावा लागेल. राज्य सरकार आणि केंद्राने मदत करण्यासाठी आवश्यक धोरण ठरवणे गरजेचे आहे. मत्स्य व्यवसायालाही मोठा फटका बसला आहे. आधीच कोरोना आणि वादळामुळे दुहेरी फटका बसल्याने त्यासाठी वेगळे पॅकेज देणे आवश्यक आहे, असे शरद पवारांनी स्पष्ट केले.

वीज पुरवठा हवा
छोटे व्यावसायिक अडचणीत आहेत. पाच ते सहा दिवसांच्या आत वीज पुरवठा सुरळीत करणे आवश्यक आहे. टाटा, रिलायन्स, अदानी यांच्याशी संपर्क साधून त्यांची टीम या ठिकाणी आली तर मदत होईल. अदानीमधून काहीजण मदतीला आले, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. पाणीपुरवठा लवकर सुरू केला पाहिजे, असेही पवार यांनी नमूद केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: 'ती भटकती आत्मा कोण PM मोदींना विचारणार', शरद पवारांवर केलेल्या अप्रत्यक्ष टीकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया

Latest Marathi News Live Update : दादर पूर्वच्या शिंदे वाडी येथून १.१४ कोटींची रोकड जप्त

Mumbai Lok Sabha: मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून रवींद्र वायकर शिवसेनेचे उमेदवार

T20 WC 24 Team India Squad : ना अय्यर... ना राणा... शाहरुख खानने 'या' खेळाडूला संघात घेण्याची केली मागणी

Karmaveerayan: 'कर्मवीरायण' मधून उलगडणार कर्मवीर भाऊराव पाटील यांचं जीवनचरित्र; 'या' दिवशी रिलीज होणार चित्रपट

SCROLL FOR NEXT