rape file
rape file Team eSakal
देश

"फक्त थडगं अन् आईचं गर्भाशयंच सुरक्षित"; अल्पवयीन मुलीची सुसाईड नोट व्हायरल

Amit Ujagare (अमित उजागरे)

चेन्नई : तामिळनाडूतील (Tamil Nadu) एका अल्पवयीन मुलीनं लैंगिक अत्याचाराचा आरोप करणारी सुसाईड नोट (Suicide Note) लिहून आत्महत्या केल्यानं खळबळ उडाली आहे. या सुसाईड नोटमध्ये तिनं लिहून ठेवलेल्या संदेशामुळं मात्र आपण किती रानटी वृत्तीचे आहोत हे अधोरेखित केलं आहे. "फक्त आईचं गर्भाशय अन् थडगंच सुरक्षित आहे" असं तिनं आपल्या सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, चेन्नईतील मंगडू येथे गेल्या आठवड्यात एका कनिष्ठ महाविद्यालयात ११ वीच्या वर्गात शिकणाऱ्या या मुलीनं आपल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. शनिवारी तिनं आत्महत्येपूर्वी लिहिलेली सुसाईड नोट सापडली आली आहे. या सुसाईड नोटमध्ये तिनं लैंगिक अत्याचार थांबवा असा मथळा दिला असून पुढे तिनं आपल्याला झालेल्या मानसिक त्रासाबद्दल लिहिलं आहे. तिनं सर्वच पालकांना आवाहन केलं की, समाजात मुलींचा कसा आदर करायचा? हे प्रत्येकानं आपल्या मुलांना शिकवायला हवं. नातेवाईक किंवा शिक्षकांवरही विश्वास ठेऊ नका. केवळ आईचं गर्भाशय आणि कबर या दोनच गोष्टी सध्या मुलींसाठी सुरक्षित आहेत.

तिनं असंही म्हटलंय की, शाळा किंवा नातेवाईकांची घरंही मुलींसाठी सुरक्षित नाहीत. प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनुसार, पीडित मुलीच्या पालकांच्या माहितीनुसार, त्यांच्या मुलीवर आधीच्या शाळेमध्ये कोणीतरी लैंगिक छळ केला होता. यानंतर तिची शाळा बदलण्यात आली तरीही तिच्यावरील अत्याचाराचा प्रकार थांबला नाही.

पीडितेच्या काही मित्र-मैत्रिणींनी पोलिसांना खासगीत माहिती देताना सांगितलं की, काही काळापासून पीडित मुलगी आपल्या मित्र-मैत्रिणींमध्येही गेल्या काही दिवसांपासून मिळून-मिसळून राहत नव्हती. आपल्या पत्रात पीडित मुलीनं लिहिलं की, लैंगिक छळ असह्य होत आहे आणि त्यामुळे तिला खूप वेदना होत आहेत परंतु कोणीही तिचं सांत्वन केलेलं नाही. यामुळं मी माझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रीत करु शकत नव्हते. तिला वारंवार वाईट स्वप्न येत होती आणि अनेकदा रात्रीची झोपही लागत नव्हती, असंही तिनं आपल्या सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT