Operation Ganga Team eSakal
देश

Ukraine Russia War : ऑपरेशन गंगातून 15 हजार भारतीय मायदेशी

Operation Ganga : केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार 15920 भारतीयांना मायदेशी परत आणलं आहे.

सुधीर काकडे

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेल्या वादामुळे जगभरात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. प्रत्यक्ष युद्धाला आता 10 दिवस उलटून गेले असून, आतापर्यंत शेकडो नागरिकांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. युक्रेनमध्ये भारतातून देखील हजारो विद्यार्थी शिक्षण आणि नोकरीसाठी गेलेले होते. त्या सर्वांचा जीव देखील या परिस्थितीमुळे धोक्यात आहे. मात्र आता दिलासादायक माहिती अशी की, भारत सरकारने ऑपरेशन गंगा अंतर्गत तब्बल 15 हजार भारतीयांना मायदेशी परत आणलं आहे.

भारत सरकारने दिलेल्या माहितीनुसार ऑपरेशन गंगा अंतर्गत, आतापर्यंत विमानांनी 76 उड्डाणं घेतली असून, त्यामाध्यमातून 15920 हून अधिक भारतीयांना भारतात परत आणलं आहे. या 76 उड्डाणेंपैकी, 13 उड्डाणं गेल्या 24 तासात झाली असल्याची माहिती भारत सरकारने दिली आहे.

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी भारत सरकारकडून सुरु करण्यात आलेल्या 'ऑपरेशन गंगा' मोहिमेचा शेवटचा टप्पा आजपासून सुरु झाला आहे. यापार्श्वभूमीवर भारतीय दुतावासानं युक्रेनमधील भारतीय विद्यार्थ्यांना लवकरत हंगेरीया सिटी सेंटर, राकोझी युटी 90 आणि बुडापेस्ट या शहरांमध्ये पोहोचण्याचं आवाहन केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic : पुणे शहरात येणाऱ्या मार्गांवर दुतर्फा कोंडी; सध्यांकाळी रांगा वाढल्या

Rohini Kalam: धक्कादायक! फोनवर बोलली, नंतर खोलीत गेली अन्...; भारतीय महिला खेळाडूनं संपवलं जीवन

Delhi Acid Attack : राजधानी दिल्लीत संतापजनक घटना! महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर भररस्त्यात ‘अ‍ॅसिड’ हल्ला

Uttar Pradesh News : सीएम योगींची दिल्लीत पीएम मोदींशी भेट, सुमारे एक तास चर्चा; मंत्रिमंडळ विस्तारावर मंथन?

New CJI Appointment 2025 : कोण होणार देशाचे नवे सरन्यायाधीश? बीआर गवई यांनी केली नावाची घोषणा...

SCROLL FOR NEXT