Amir khan
Amir khan sakal
देश

बंगळूर : फटाक्यांच्या विरोधकांनी नमाजबद्दलही बोलावे

सकाळ वृत्तसेवा

बंगळूर : रस्त्यांवर फटका वाजवू नयेत असे आवाहन करणाऱ्या आमीर खानच्या जाहिरातीवर कर्नाटकमधील भाजपचे खासदार अनंतकुमार हेगडे यांनी आक्षेप घेतला आहे. सिएट या टायर कंपनीने दिवाळीनिमित्त ही जाहिरात बनविली आहे.

हेगडे यांनी या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ अनंतवर्धन गोएंका यांना पत्र धाडले आहे. त्यांनी म्हटले आहे की, या जाहिरातीमुळे हिंदूमध्ये असंतोष पसरला आहे. कंपनी भविष्यात हिंदूंच्या भावनांचा आदर करेल अशी आशा आहे.

रस्त्यांवर फटाके वाजवू नका असे आमीर म्हणतो आहे, पण मग नमाजच्या नावाखाली शुक्रवारी तसेच मुस्लिमांच्या महत्त्वाच्या सणांच्या दिवशी रस्ते अडविले जातात. त्यातून वाहतूक कोंडी होते. याशिवाय मशीदींच्या ध्वनिवर्धकावरून अजान दिली जाते तेव्हा ध्वनिप्रदूषण होते. याचे कारण ध्वनीपातळी निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त असते. खरे तर ही यादी फार मोठी आहे. येथे मोजकाच तपशील दिला आहे, पण अशा समस्यांवर कंपनी आवाज उठविणार आहे का, असा सवाल त्यांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ujjwal Nikam: PM मोदी अन् फडणवीसांमुळे डेव्हिड हेडलीचे स्टेटमेंट घेऊ शकलो, उज्ज्वल निकमांचा खुलासा

Panchayat 3 Release Date Out: प्रतीक्षा संपली! 'पंचायत-3' ची रिलीज डेट जाहीर, 'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार सीरिज

Fact Check: धर्मांतर करा असे सांगणारा कन्हैय्या कुमार यांचा फेक व्हिडीओ पुन्हा व्हायरल; वाचा काय आहे सत्य

Sushma Andhare: सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, कारण अस्पष्ट

Latest Marathi News Live Update : मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात नऊ उमेदवारी अर्ज दाखल

SCROLL FOR NEXT