Karnataka Punjab Assembly Bypoll election congress candidate won 
देश

Punjab Election : पंजाबमध्ये काँग्रेसकडून डझनभर उच्चशिक्षित उमेदवारांना संधी

यामध्ये पीएचडी, सॉफ्टवेअर इंजिनिअर, एमबीए, कायद्याचं शिक्षण घेतलेल्या उमेदवारांचा समावेश

सकाळ डिजिटल टीम

चंडीगड : पंजाबमधील विधानसभा निवडणुकीत (Punjab Election) काँग्रेस (Congress) आणि आम आदमी पक्ष (Aam Aadmi Party) यांच्यातच खरी लढत असल्याचं मानलं जातं आहे. काँग्रेसने यंदा अनेक नव्या उमेदवारांना संधी दिली असून या नव्या उमेदवारांपैकी अनेक जण तरुण आणि उच्चशिक्षित आहेत. यातील काही जण सॉफ्टवेअर अभियंते आणि शिक्षक आहेत, तर काही जणांकडे नामांकित विद्यापीठांची पदवी आहे. काही जण राजकीय घराण्यांमधूनही आले आहेत. (Opportunity for dozens of highly educated candidates from Congress in Punjab)

कोण आहेत उच्चशिक्षीत उमेदवार?

संदीप जाखड : वय ४५. काँग्रेस नेते सुनील जाखड यांचे पुतणे. फ्लोरिडा आंतरराष्ट्रीय विद्यापीठात शिक्षण.

मालविका सूद : वय ३८. सॉफ्टवेअर इंजिनिअर. अभिनेता सोनू सूद याची बहिण.

रणवीर कौर मियान : वय ३०. इंग्रजी विषयात पीएच. डी. खासगी महाविद्यालयात व्याख्याता म्हणून काम.

मोहित मोहिंद्र : वय ३२. पंजाबचे मंत्री ब्रह्म मोहिंद्र यांचे पुत्र. कायद्याचे पदवीधर.

कामिल अमरसिंग : वय ३४. ब्रिटनमधील केंब्रिज विद्यापीठातून एमबीए. सध्या राज्य काँग्रेसचे प्रवक्ते. खासदार डॉ. अमरसिंग यांचे पुत्र.

याशिवाय नव्वदच्या दशकात मंत्रिपद भूषविलेल्या गुरनामसिंग खुराना यांचे पुत्र जगपालसिंग अबुल खुराना, शिक्षक असलेल्या राजिंदर कौर, गायक सिधू मूसेवाला, युवक काँग्रेसचे नेते अमरप्रितसिंग लाली यांना काँग्रेसने संधी दिली असून हे सर्वजण प्रथमच निवडणूक लढवित आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"अपमान सहन करून ते कॉरिडॉरमध्ये बसून राहायचे" रंजनाच्या अपघातानंतर अशोक मामांच्या अवस्थेबद्दल खुलासा

Pune Fraud News : शेअर बाजारात चांगल्या परताव्याच्या आमिषाने ज्येष्ठाची दीड कोटींची फसवणूक

Rain-Maharashtra Latest Live News Update: लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या १२,००० पुरूषांच्या खात्यांची तपासणी सुरु - आदिती तटकरे

Online Gaming Bill 2025 : लोकसभेत 'ऑनलाइन गेमिंग विधेयक-२०२५' मंजूर!

Tirupati Balaji Temple : अशीही बालाजी भक्ती! तिरुपती मंदिरात भाविकाने दान केलं तब्बल १२१ किलो सोनं; किंमत ऐकून थक्क व्हाल....

SCROLL FOR NEXT