farm laws, PM Narendra Modi, Kutch , Gujarat 
देश

विरोधक शेतकऱ्यांना भडकवत आहेत; PM मोदींचा गुजरातमधून आरोप

सकाळ ऑनलाईन टीम

कच्छ :  राजधानी दिल्लीच्या वेगवेगळ्या सीमाभागात कृषी कायद्याच्या विरोधात शेतकरी एकवटले आहेत. दिल्ली चलो म्हणत सरकारविरोधात एकवटलेल्या शेतकऱ्यांना पंतप्रधान मोदींनी गुजरातमधून संदेश दिला आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी कटिबद्ध आहे. प्रथम प्राधान्य हे शेतकऱ्यालाच असेल, असे वक्तव्य मोदींनी गुजरातमध्ये केले आहे.  शेतकऱ्यांच्या समस्या दूर करण्यासाठी सरकारचं दार 24 खुले आहे, असेही मोदी यावेळी म्हणाले. 

दिल्लीच्या सीमाभागात काहीजण शेतकऱ्यांना भडकवण्याचे काम करत आहेत, असा टोला त्यांनी गुजरातमधील भाषणातून विरोधकांना लगावला. कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांमध्ये चुकीची माहिती पसरवण्याचे काम विरोधक करत आहेत. या कायद्याच्या माध्यमातून जमीनीवर कब्जा केला जाईल, अशी भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण केली जात आहे, असा आरोप मोदींनी नाव न घेता विरोधी पक्षावर केला.  

अनेक वर्षांपासून कृषी कायद्याची मागणी होत होती. अनेक शेतकरी संघटना देखील यात सामील होत्या. शेतकऱ्यांना कोणत्याही ठिकाणी आपला माल विकता यावा, अशी मागणीही करण्यात आली होती, असे सांगत शेतकऱ्यांच्या हितासाठीच कृषी कायदा लागू केला, असे मोदींनी म्हटले आहे.  विरोधकही कृषी कायद्याच्या बाजूने होते. सत्तेवर असताना त्यांना हा कायदा लागू करता आला नाही. आज ते शेतकऱ्यांना या कायद्या विरोधात भडकवण्याचे काम करत आहेत.

सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतल्यानंतर शेतकऱ्यांना भ्रमित करण्याचे काम सुरु झाले आहे. शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या अडचणींना समोरे जावे लागणार नाही. त्यांच्या प्रत्येक शंकेच निरसन करण्यासाठी 24 तास सरकार सज्ज राहिल, असे आश्वासन देत मोदींनी शेतकऱ्यांचे मन वळवण्याच प्रयत्न केलाय. शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार कटिबद्ध असून शेतकऱ्यांचे उत्पन्न अधिक वाढावे यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचेही मोदींनी म्हटले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Road Accidents Reduction : २०३० पर्यंत रस्ते अपघात ५० टक्क्यांनी कमी होणार? ; राज्यसभेत गडकरींनी दिली महत्त्वपूर्ण माहिती

Pune Mumbai Expressway Traffic : द्रुतगती मार्गावरील अपघाताचा फटका; पुणे-बंगळूर महामार्गावर अवजड वाहतूक ठप्प

T20 World Cup: इशान किशनच ओपनर! सूर्याचा विश्वास पठ्ठ्याने सार्थ ठरवला, 7 Six अन् फिफ्टी; संजूचे स्थान धोक्यात

Pune Crime : मैत्रिणीला फोन केल्याच्या वादातून तरुणावर कोयत्याने हल्ला

Jan Arogya Yojana : राज्‍यातील उपकेंद्र, प्राथमिक आरोग्‍य केंद्रातही महात्‍मा फुले योजना; आता बाह्यरुग्ण विभागातील उपचारही मिळतील मोफत

SCROLL FOR NEXT