Margaret Alva 
देश

'युपीए'कडून उपराष्ट्रपतीपदासाठी मार्गारेट अल्वा; शरद पवारांनी केली घोषणा

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - संयुक्त पुरोगामी आघाडीकडून उपराष्ट्रपती पदासाठी आज उमेदावारी जाहीर करण्यात आली आहे. भाजपकडून उपराष्ट्रपती पदासाठी जगदीप धनखड यांनी उमेदवारी देण्यात आली आहे. तर युपीएकडून काँग्रेसनेत्या मार्गारेट अल्वा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. (Vice President news in Marathi)

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत अल्वा यांच्या नावाची घोषणा केली. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसनेते मल्लिकार्जून खरगे उपस्थित होते. शरद पवार म्हणाले की, विरोधी आघाडीतील पक्षांसोबत यांच्यासोबत चर्चा करून माजी केंद्रीयमंत्री, माजी राज्यपाल मार्गारेट अल्वा यांचं नाव उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून निश्चित केलं आहे.

मार्गारेट अल्वा यांना विरोधी गटातील १७ पक्षांचा पाठिंबा असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं. उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 19 जुलै असून मतदान 6 ऑगस्टला होणार आहे.

राष्ट्रपतीपदासाठी भाजपने आदिवासी नेत्या द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी दिली आहे. तर राष्ट्रपतीपदासाठी यशवंत सिन्हा यांना उमेदवारी देण्यात आली आङे. राष्ट्रपतीपदासाठी उद्या मतदान होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Census: महाराष्ट्रात जनगणना कधी सुरू होणार? हा कार्यक्रम किती काळ चालणार? तारखा आल्या समोर...

Video : स्वानंदी समरच्या प्रेमकथेला सुरुवात ! समरला मिळालं रोमँटिक सरप्राईज; प्रोमो पाहून प्रेक्षक खुश

LPG Cylinder: सिलेंडरसाठी वाट पाहणं संपलं! इंडेनचा ‘छोटू’ LPG सिलेंडर बाजारात; किराणा दुकानातही सहज मिळणार

माईक हिसकावला आणि स्टेजवरुन हकललं, प्रसिद्ध कॉमेडीयन सुनील पालचा भर कार्यक्रमात अपमान, Viral Video

Central Railway: मध्य रेल्वेवर गोंधळाची परिस्थिती, रुळावर पडून प्रवाशाचा मृत्यू, लोकल सेवा खोळंबली

SCROLL FOR NEXT