Narendra Modi Esakal
देश

Narendra Modi: विरोधकांना मोदींच्या शपथविधीचं निमंत्रणच नाही; जयराम रमेश म्हणतात, एक तृतीयांश पंतप्रधान...

नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधानपदाचा शपथविधी सोहळा रविवारी संध्याकाळी राष्ट्रपती भवन इथं पार पडणार आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधानपदाचा शपथविधी सोहळा रविवारी संध्याकाळी राष्ट्रपती भवन इथं पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी शेजारील देशांच्या प्रमुखांना विशेष निमंत्रण देण्यात आलं आहे. पण अद्याप विरोधकांना या सोहळ्यासाठीचं निमंत्रण देण्यात आलेलं नाही. यावरुन काँग्रसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी मोदींवर टीका केली आहे. (Opposition not invited to Narendra Modi swearing in ceremoney Jairam Ramesh says Modi as one third of Prime Minister)

रमेश म्हणाले, "स्वयंघोषित विश्वगुरु आता स्वयंघोषित विश्वबंधू झालेत. त्यांनी आपल्या शपथविधीसाठी आंतरराष्ट्रीय नेत्यांना प्राधान्य दिलं आहे. पण अद्याप आम्हाला कुठल्याही स्वरुपाचं निमंत्रण आलेलं नाही. पण मला असं म्हणावसं वाटतंय की, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदींची खूपच फरफट झाली त्यांचं वैयक्तिक नुकसान झालं आहे. तसंच राजकीय हार आणि मानसिक पिछेहाट झाली आहे. आम्हाला जरी उद्याच्या शपथविधीसाठी निमंत्रण दिलेलं नसलं तरी त्याला उपस्थित राहण्यासारखं काय आहे?"

त्यामुळं आता नरेंद्र मोदी हे एक तृतीयांश पंतप्रधान आहेत. कारण चंद्राबाबू नायडू आणि नितेश कुमार यांच्याशिवाय ते पंतप्रधान होऊ शकत नाहीत. २४० जागांसह ते पंतप्रधान होत आहेत. पण जवाहरलाल नेहरु हे सलग तीन वेळेस पंतप्रधान झाले पण दोन तृतीयांश बहुमतानं झाले होते आणि शेवटपर्यंत ते लोकशाहीवादी राहिले, असा टोलाही यावेळी रमेश यांनी मोदींना लगावला.

दरम्यान, मला वाटतं उद्याच्या शपथविधीला कुठलीही वैधता नाही. कारण त्यांचे मित्रपक्ष हे त्यांच्यासोबत राहतील की नाही हे सांगू शकत नाही. त्यांच्या मागण्या काय असतील हे सांगू शकत नाही. पण आता नायडूंच्या आंध्र प्रदेशात मुस्लिमांना ओबीसीमधून आरक्षण मिळतं आहे आणि मोदींनी तर कर्नाटकातील मुस्लिमांच्या आरक्षणावर हल्लाबोल चढवला होता. त्यामुळं आता त्यांच्या भूमिकेत विरोधाभास दिसणार आहे. मोदींचा डीएनए हा हुकुमशहाचा आहे. आघाडीचं सरकार चालवण्याची त्यांच्यात क्षमता नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जय शिवराय! 'या' सिनेमागृहात 'राजा शिवाजी' सिनेमा मोफत पाहता येणार, पहा संपूर्ण यादी

HSC result 2026 Maharashtra : बारावीचा निकाल 2 मे रोजी, 'या' लिंकवर निकाल पाहता येणार

Sunetra Pawar Banner in Pandharpur : 'माझा विठ्ठल...!' देवघरात अजितदादांची प्रतिमा, आता पंढरपूरच्या वेशीवर सुनेत्रा पवारांसाठी 'तो' बॅनर चर्चेत!

Mumbai Pune Expressway Traffic : वाहतूक कोंडीत अडकलेल्या वाहनांकडून टोल घेऊ नका, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सूचना

Who is Arshad Khan? मुंबई इंडियन्सने पहिली संधी दिली अन् तो आता गुजरात टायटन्ससाठी ठरतोय एक्स फॅक्टर; RCB लाही दिलाय त्रास

SCROLL FOR NEXT