Presidential Election
Presidential Election esakal
देश

विरोधी पक्षाचा 'बिगर काँग्रेसी' राष्ट्रपतीपदाचा उमेदवार असणार?

सकाळ डिजिटल टीम

निवडणूक आयोगानं राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची तारीख जाहीर केलीय.

Presidential Election : निवडणूक आयोगानं (Election Commission) राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची तारीख जाहीर केलीय. निवडणुकीसाठी 18 जुलै रोजी मतदान होईल, त्यानंतर 21 जुलै रोजी निकाल येतील. राष्ट्रपती निवडणुकीसाठी 29 जून रोजी उमेदवारी अर्ज, छाननी 30 जून रोजी होणार आहे. निवडणुकीची तारीख जाहीर होताच निवडणूक प्रक्रिया सुरू होईल, याची नोंद घ्यावी. देशातील नवीन राष्ट्रपतींना 25 जुलैपर्यंत शपथ घ्यायची आहे. शेवटची राष्ट्रपतीपदाची निवडणूक 2017 मध्ये 17 जुलै रोजी झाली होती.

दरम्यान, याच पार्श्वभूमीवर सरकारसह विरोधकही सक्रिय झाले आहेत. विशेषत: काँग्रेस (Congress) राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीमध्ये आपली ताकद दाखवत आहे. निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर लगेचच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी कम्युनिस्ट सीताराम येचुरी, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्याशी चर्चा केली. इतकंच नाही तर सोनिया गांधींना कोरोनाची लागण झालीय. अशा स्थितीत समविचारी पक्षांशी संबंध प्रस्थापित करण्याची जबाबदारी त्यांनी मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांच्याकडं सोपवलीय.

मल्लिकार्जुन खरगे यांनी काल मुंबईत शरद पवार यांची भेट घेतली आहे. आता ते द्रमुकचे स्टॅलिन आणि टीएमसी नेत्या ममता बॅनर्जी यांची भेट घेणार आहेत. यानंतर एक बैठक बोलावण्यात येईल, यामध्ये कोणाला राष्ट्रपतीपदाचा उमेदवार बनवता येईल यावर चर्चा केली जाईल, असं काँग्रेस नेत्यांचं म्हणणं आहे. पक्षाला आपला उमेदवार न देता इतर कोणत्याही पक्षाला संधी द्यायची आहे, जेणेकरून एकीचा संदेश जाईल आणि विरोधकांना सोबत घेता येईल, असं काँग्रेस सूत्रांचं म्हणणं आहे.

'या' तीन पक्षांच्या भूमिकेकडं लक्ष

विरोधी पक्षांचं संपूर्ण लक्ष तेलंगणा राष्ट्र समिती, वायएसआर काँग्रेस आणि बीजेडीवर आहे. या पक्षांनी अनेक वेळा संसदेत भाजपला पाठिंबा दिलाय. अशा स्थितीत त्यांची भूमिका विरोधी एकजुटीच्या दृष्टीनं महत्त्वाची मानली जात आहे. येत्या काही दिवसांत बैठक घेणार असून, त्यात कोणाला विरोधी पक्षाचा चेहरा बनवायचा याबाबत निर्णय घेतला जाईल, असं एका ज्येष्ठ नेत्यानं सांगितलंय. 5 राज्यांमध्ये काँग्रेसला पराभवाला सामोरं जावं लागत असताना विरोधी पक्षांच्या निवडणुका होत आहेत. त्याचवेळी काँग्रेसशी फारसे चांगले संबंध नसलेल्या भाजपविरोधात टीआरएससारख्या पक्षानं आघाडी उघडलीय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT