Supreme Court sakal
देश

Supreme Court : दिल्लीसाठी पाणी सोडण्याचे आदेश;राजधानीतील रहिवाशांना आणि सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

‘‘दिल्लीला भेडसावणारी पाणी समस्या ही राजधानी दिल्लीच्या अस्तित्वाचा प्रश्‍न आहे,’’ अशी टिपणी करत सर्वोच्च न्यायालयाने हिमाचल प्रदेश सरकारला दिल्लीला अतिरिक्त १३७ क्यूसेक पाणी सोडण्याचा आणि हरियाना सरकारला ते पाणी दिल्लीला देण्याचा आदेश गुरुवारी दिला.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : ‘‘दिल्लीला भेडसावणारी पाणी समस्या ही राजधानी दिल्लीच्या अस्तित्वाचा प्रश्‍न आहे,’’ अशी टिपणी करत सर्वोच्च न्यायालयाने हिमाचल प्रदेश सरकारला दिल्लीला अतिरिक्त १३७ क्यूसेक पाणी सोडण्याचा आणि हरियाना सरकारला ते पाणी दिल्लीला देण्याचा आदेश गुरुवारी दिला. पाण्यावरून कोणीही राजकारण करू नये असे खडे बोलही न्यायालयाने यावेळी सुनावले. न्यायाधीश पी. के. मिश्रा आणि के. व्ही. विश्‍वनाथन यांच्या सुटीकालीन खंडपीठाने याबाबत आदेश दिले.

‘दिल्लीला १३७ क्यूसेक अतिरिक्त पाणी देण्यास हिमाचल प्रदेश सरकारची कोणतीही हरकत नाही. त्यामुळे आम्ही हिमाचल प्रदेश सरकारला पाणी सोडण्याचे आदेश देत आहोत, हे पाणी हथनीकुंड बॅरेजमध्ये येऊन तेथून वझिराबाद येथून दिल्लीचा सोडण्यात यावे’’ असे आदेश न्यायालयाने दिले.

पाणीटंचाईची भीषण परिस्थिती लक्षात घेत, हिमाचल प्रदेश सरकारने हरियाना सरकारला पूर्वकल्पना देत, सात जूनला पाणी सोडावे आणि हरियाना सरकारने ते दिल्लीला सोडावे असेही न्यायालयाने सांगितले. दरम्यान, दिल्ली सरकारनेदेखील पाणी व्यवस्थापन चोख ठेवावे आणि पाणी वाया जाणार नाही याची काळजी घ्यावी असे न्यायालयाने दिल्ली सरकारला सांगितले आहे. याबाबत दिल्ली, हरियाना आणि हिमाचल प्रदेश सरकारने प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

दिल्लीतील पाणी टंचाई दूर करण्यासाठी हिमाचल प्रदेश सरकारकडून आलेले पाणी दिल्लीला सोडण्याचे आदेश हरियाना सरकारला द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका दिल्ली सरकारने सर्वोच्च न्यायालयात केली होती त्यावर आज सुनावणी झाली. दिल्ली सरकारतर्फे ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी न्यायालयात बाजू मांडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT