IED  Team eSakal
देश

भारत-म्यानमार सीमेवर लष्कराला सापडली 250 किलो स्फोटकं

झाडांच्या पानांखाली लपवलेले बॉक्स दिसल्यानंतर जवानांनी तपासणी केली असता त्यात स्फोटकं आढळली.

सुधीर काकडे

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या हालचाली वाढत असतानाच आता लष्करासमोरील आव्हानं आणखी वाढताना दिसता आहेत. कारण भारत आणि म्यानमार सीमेवर आज आसाम रायफल्सच्या 43 जवानांनी मणिपूरजवळील (Manipur) भारत-म्यानमार सीमेजवळून तपासणीदरम्यान 200 हून अधिक आयईडी (Improvised explosive device) जप्त केले आहेत. एवढ्या प्रमाणात स्फोटकांचा साठा जप्त करत लष्कराने एका मोठ्या हल्ल्याचा कट उधळून लावला आहे.

मणिपूरमधील म्यानमारलगतच्या सीमेवर असलेल्या भागातून 250 किलो पेक्षा जास्त स्फोटकं जप्त करण्यात आली आहेत. या सीमावर्ती राज्यामध्ये पुढच्यावर्षी विधानसभा निवडणूक होणार असून, निवडणुकांच्या दृष्टीने सुरक्षा यंत्रणांसमोरील आव्हानं वाढताना दिसता आहेत. आसाम रायफल्सच्या जवानांनी मणिपूरमधील सीमावर्ती भागातील मोठी बाजारपेठ असेल्या मोरेह मधून 243 IED जप्त केले आहेत.

सीमेवर गस्त घालत असताना सैन्याला झाडाच्या पानांखाली लपवलेले मोठे लपवलेले बॉक्स सापडले. लष्कराने पुढील कारवाईसाठी स्फोटकं मोरेह पोलिसांच्या ताब्यात दिली आहेत अशी माहिती लष्करी आधिकाऱ्यांनी दिली आहे. मोरेह येथून सुमारे 250 पेक्षा जास्त वजनाचे वेगवेगळ्या आकाराचे आयईडी जप्त करण्यात आले असल्याची माहिती 43 आसाम रायफल्सकडून देण्यात आली आहे. मणिपूरमध्ये भारत आणि म्यानमार दरम्यान 398 किमीची भुसीमा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एवढ्या मोठ्या प्रमाणात स्फोटकं सापडणं हे पुढच्यावर्षी मणिपूरमध्ये होणाऱ्या निवडणुकीदरम्यान दहशतवादी हल्ल्यांच्या योजनांचे संकेत असू शकतात.

दरम्यान, राज्य सरकारने परवानाधारक बंदूकधारकांना निवडणुकीपूर्वी शस्त्रे जमा करण्यास सांगितले होते. मणिपूर विधानसभेचा सध्याचा कार्यकाळ फेब्रुवारीमध्ये संपणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT