देश

पाकिस्तानकडून वर्षभरात 2000 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन

सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : पाकिस्तानकडून दिल्या जाणाऱ्या युद्धाच्या धमक्‍या आणि वाढत्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर भारताने नियंत्रणरेषेवर होणाऱ्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनावर गंभीर चिंता व्यक्त केली आहे. कुरापतखोर पाकिस्तानने या वर्षात दोन हजारहून अधिक वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले असून, दहशतवाद्यांच्या घुसखोरीसाठी नियंत्रणरेषेवर भारतीय चौक्‍यांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप परराष्ट्र मंत्रालयाने केला आहे. 

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी पाकिस्तानचा खोटेपणा उघड पाडणारे छोटेखानी निवेदनच आज जारी केले. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, पाकिस्तान केवळ घुसखोरीच्या उद्देशाने जम्मू-काश्‍मीरमध्ये नियंत्रणरेषेवर भारतीय चौक्‍यांना लक्ष्य करीत आहे. पाकिस्ताने या वर्षभरात कोणत्याही कारणाविना 2050 हून अधिक वेळा भारतीय चौक्‍यांवर गोळीबार आणि तोफगोळ्यांनी मारा केला. यात 21 भारतीयांना प्राण गमवावे लागले. 

पाक लष्कराने 2003 च्या शस्त्रसंधीचे पालन करावे, अशी स्पष्ट समज पाकिस्तानला या हल्ल्यांबाबत देण्यात आली आहे. पाकिस्तानने नियंत्रणरेषेवर आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर शांतता राखणे नितांत गरजेचे आहे, असा सल्ला परराष्ट्र मंत्रालयाने दिला आहे.

सोबतच, पाकिस्तानकडून होणाऱ्या प्रत्येक शस्त्रसंधीचे सडेतोडपणे प्रत्युत्तर भारतीय लष्कराकडून दिले जात आहे आणि दहशतवाद्यांची घुसखोरीदेखील उधळून लावली जात असल्याचेही परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Police ACP Vivek Bhagat : महिला पत्रकारांसोबत गैरवर्तन भोवले, एसीपी विवेक भगत यांची पदोन्नती रोखली; सरकारचा अर्ध्या रात्री निर्णय

RBI Repo Rate: 7 ऑक्टोबरला मोठा निर्णय! FD करणाऱ्यांना मिळणार मोठा फायदा? जाणून घ्या काय बदलणार

अटक करणार नाही म्हणत १.३० लाखांची मागणी, लाच घेताना PSIला रंगेहाथ अटक; बोरिवली पोलीस ठाण्यात ACBची मोठी कारवाई

Marathi News Live Updates: ४५ हजार शेतकऱ्यांचे केळी पीक विमा अर्ज नामंजूर; विमा कंपनीच्या कारभारावर गंभीर आरोप

Suryakumar Yadav: सूर्याचा मोठा 'गेम' झाला... आधी विचारलं खेळणार का, त्याने हो म्हटलं अन् निवड समितीने संघाबाहेर केलं

SCROLL FOR NEXT