vaccine 
देश

Corona Vaccine: 'ऑक्सफर्डची लस एप्रिलमध्ये, दोन डोसची किंमत असणार 1000 रुपये'

सकाळ ऑनलाईन टीम

नवी दिल्ली: भारतात कोरोनावरील लस बनवत असलेली कंपनी सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आदर पूनावाला यांनी कोरोनावरील लस पुढील वर्षी एप्रिल महिन्यापर्यंत येईल असं सांगितले आहे. सुरुवातीला ही लस आरोग्य कर्मचारी आणि वृध्दांना देण्यात येणार आहे.

सामान्य नागरिकांसाठी लसीच्या दोन डोसची किम्मत एक हजार रुपये असणार असल्याची माहितीही पुनावाला यांनी दिली आहे. पण हे शेवटच्या चाचण्या आणि नियामक संस्थांच्या मंजुरीवर अवलंबून असणार आहे. तसेच 2024 पर्यंत प्रत्येक भारतीयाला कोरोनाची लस दिली गेलेली असेल आणि भारतातील प्रत्येक व्यक्तीला लस द्यायला दोन-तीन वर्षे लागतील,अशी माहितीही आदर पुनावाला यांनी दिली.

दिवाळीनंतर कोरोनाचा प्रसार देशात वाढताना दिसत आहे. मागील 24 तासांत कोरोनाचे 45 हजार 882 रुग्ण आढळले असून 584 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशातील कोरोना बाधितांची संख्या 90 लाखांच्या वर गेली आहे. मागील काही दिवसांत कोरोना रुग्णांची प्रतिदिन रुग्णवाढ 30 हजारांच्या खाली आली होती. पण आता रुग्णवाढीने मोठा वेग पकडला आहे. 

आतापर्यंत देशात कोरोनाच्या एकूण 90 लाख 4 हजार 366 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर एकूण मृत्यूंचा आकडा 1 लाख 32 हजार 162 वर गेला आहे. सध्या देशभरात कोरोनाचे  4 लाख 43 हजार 794 रुग्ण उपचार घेत आहेत. मागील 24 तासांत सक्रिय रुग्णांची संख्या 491 ने कमी झाली आहे. 

औषध निर्माती फायजर कंपनीने कोरोनावरील लशीच्या अंतिम टप्प्यातील चाचणीचे 95 टक्के निकाल सकारात्मक आल्याचा दावा केला आहे. लवकरच लशीच्या मंजुरीसाठी एक-दोन दिवसांत अर्ज करणार असल्याची माहितीही कंपनीने दिली आहे. 

अंतिम विश्लेषणाच्या काही दिवस आधी फार्मास्युटिकल औषध कंपनी फायजरने म्हटले होते की, लशीच्या विश्लेषणावरुन समजते की ही लस कोविड-19 रोखण्यात 90 टक्केपर्यंत प्रभावी ठरु शकते. यावरुन लशीचे परीक्षण व्यवस्थित सुरु असल्याचे संकेत मिळत आहेत. दरम्यान, या लशीवरुन अमेरिकेचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी फायजर कंपनीचे अभिनंदन केले होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

JP Nadda: आरक्षण हटाओ आंदोलन! शिष्टमंडळाने घेतली जेपी नड्डांची भेट; 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा

Marathi News Live Updates : नेपाळमधून जी दृश्ये समोर येत आहेत, ती अत्यंत विनाशकारी आणि हृदयद्रावक आहेत - आदित्य ठाकरे

WTC 2025-27: भारतीय संघाचं गणित बिघडलं! श्रीलंकेविरुद्धच्या 'ड्रॉ'नंतर Points Table मध्ये टीम इंडिया कोणत्या स्थानावर

Marathi Language Rule: ऑटो-टॅक्सी चालकांना दिलासा! मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदत; देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय

Car Care Tips: कारमध्ये फोन चार्ज करताय? 'या' ४ चुकांमुळे मोबाईलचा ब्लास्ट अन् कारची बॅटरी होऊ शकते डेड!

SCROLL FOR NEXT