P. Chidambaram 
देश

P. Chidambaram: महाराष्ट्रात ट्रिपल इंजिन नाही, तीन पायांचे जनावर सत्तेत; पी चिदंबरम यांचे टीकास्त्र

Sandip Kapde

महाराष्ट्रात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झाल्यानंतर अजित पवार आमदारांसह सत्तेत सहभागी झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात ट्रिपल इंजिन सरकार असल्याचे वक्तव्य एकनाथ शिंदे आणि फडणवीस करत असतात. दरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी बुधवारी महाराष्ट्र सरकारवर टीकास्त्र सोडले.

"महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री दावा करतात की त्यांचे सरकार ट्रिपल इंजिनचे सरकार आहे. हे मला 100 मीटरच्या शर्यतीत धावणाऱ्या तीन पायांच्या जनावरासारखे वाटते. महाराष्ट्रातील नऊ नवीन मंत्र्यांना कोणतेही काम नाही कारण त्यांना खात्यांचे वाटप झाले नाही," असे पी चिदंबरम यांनी म्हटले आहे.

चिदंबरम म्हणाले, "फडणवीसांसह इतर 20 मंत्र्यांपैकी कोणालाही कोणतेही खाते सोडायचे नाही. यावर उपाय आहे. नऊ नवीन मंत्री खात्याशिवाय मंत्री असतील, अशी घोषणा करा."

अजित पवार यांनी नुकतीच उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) आठ आमदारांनी शिवसेना आणि भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये मंत्री म्हणून शपथ घेतली.

अजित पवारांच्या बंडानंतर एकनाथ शिंदे म्हणाले होते, "आता डबल इंजिन सरकारला ट्रिपल इंजिन आहे. राज्य वेगाने विकासाच्या मार्गावर धावणार आहे. आता आपल्याकडे एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे वेगाने विकास होण्यास मदत होईल. "

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: सतर्कतेचा इशारा! महाराष्ट्रात पुढील ५ दिवस मुसळधार पावसाचा धोका; पण कुठे? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट

IND vs ENG, 4th T20I: भारतासमोर मालिका वाचवण्याचे आव्हान, चौथ्या सामन्याची नेमकी वेळ काय अन् कुठे पाहाणार?

Pali News : वाकण-पाली मार्ग सलग तिसऱ्या दिवशी बंद; भेरव अंबा नदी पुलावरूनही पाणी, मुंबई व पुणे संपर्क बाधित

Ramesh Mhatre: महिला डॉक्टरला मारहाण प्रकरणात मोठी अपडेट! नगरसेवक रमेश म्हात्रेंना अखेर अटक; व्हायरल व्हिडिओनंतर पोलिसांची कारवाई

ICC T20I Rankings: भारतीय संघाला इंग्लंडमध्ये विजयाची प्रतिक्षा, पण ईशान-अभिषेकने केलंय टॉप! पाहा Top-10 लिस्ट

SCROLL FOR NEXT