देश

"मोदीजी, लसीकरणाचं झालं; आता पेट्रोलच्या शंभरीवर सेलिब्रेशन व्हावं"

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली: भारताने लसीकरणामध्ये 100 कोटींचा आकडा पार केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी देशवासीयांसमोर येत संबोधन केलं. आपण एकत्रितपणे मिळून केलेली ही मोठी कमाई असून देशातील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कष्टाचं हे फळ असल्याचं नमूद करत हा क्षण साजरा करण्यात आला. मात्र, आता या सेलिब्रेशनवर काँग्रेसने टीका केली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधत म्हटलंय की, ज्याप्रकारे देशात 100 कोटी लसीकरणाचा टप्पा गाठल्यानंतर पंतप्रधान मोदींनी सेलिब्रेशन केलं त्याचप्रमाणे त्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरांनी शंभरी गाठल्यावर देखील सेलिब्रेशन केलं पाहिजे.

चिदंबरम यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय की, पंतप्रधान मोदींनी शंभर कोटी लसीकरणाचा टप्पा गाठल्यानंतर मोठे सेलिब्रेशन करण्यासाठी आपल्या मंत्र्यांचे नेतृत्व केले. मात्र, त्यांनी आणखी काही गोष्टींनी शंभरी गाठल्या आहेत, त्याचं देखील सेलिब्रेश करायला हवं. पेट्रोलने 100 रुपये प्रति लीटरचा टप्पा गेल्या काही आठवड्यांपूर्वी गाठला आहे तर आता डिझेलनेही 100 रुपये प्रति लीटरचा मजल मारली आहे. दुसरीकडे गॅस सिलींडरनी 1000 रुपयांचा टप्पा गाठला असून या सेलिब्रेशनसाठी या देखील मोठ्या संधी उपलब्ध असल्याचा खोचक टोला त्यांनी मोदींना लगावला आहे.

22 ऑक्टोबरला शंभर कोटी लसीकरणाचा टप्पा

कोरोना विरोधातील लढ्यामध्ये 22 ऑक्टोबर रोजी भारताने मोठा टप्पा गाठला होता. देशात एकूण लसीकरणाचा आकडा 100 कोटींच्या पार गेला आहे. फक्त 278 दिवसांच्या आतच भारताने हा आकडा पार केला आहे. लसीकरणाच्या बाबतीत भारत फक्त चीनच्या मागे आहेत. भारताच्या खालोखाल अमेरिका, रशिया आणि ब्रिटन हे देश आहेत.

पेट्रोल-डिझेल शंभरीपार

दुसरीकडे या ऑक्टोबर महिन्यातच इंधन दरवाढीने कहर केला आहे. जवळपास प्रत्येक दिवशी इंधनाच्या दरामध्ये वाढ झाल्याचं पहायला मिळत आहे. सध्या अनेक राज्यांमध्ये पेट्रोल शंभरी पार गेलं असून डिझेलने देखील शंभरीचा आकडा गाठला आहे. लोकांना अच्छे दिनाचं स्वप्न दाखवून सत्तेत आलेल्या मोदी सरकारला महागाई आटोक्यात आणण्यात अपयशच आलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT