Padma-Awards 
देश

भाजपच्या चार नेत्यांचा मरणोत्तर 'पद्म' पुरस्काराने सन्मान!

सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला शनिवारी (ता.25) केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा झाली. त्यात भाजपच्या चार नेत्यांचा मरणोत्तर सन्मान करण्यात आला आहे.

ज्येष्ठ कामगार नेते आणि माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस (मरणोत्तर), भाजपचे चाणक्‍य आणि रणनितीकार अरूण जेटली (मरणोत्तर), भाजपच्याच फायरब्रॅंड नेत्या सुषमा स्वराज (मरणोत्तर) यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला. तर गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे दिवंगत नेते मनोहर पर्रीकर (मरणोत्तर), यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 

पद्मविभूषण पुरस्कार :
जॉर्ज फर्नांडिस (मरणोत्तर) 
अरूण जेटली (मरणोत्तर) 
सर अनेरूड जुगनॉथ जीसीएसके
मेरी कोम 
छन्नुलाल मिश्रा 
सुषमा स्वराज (मरणोत्तर) 
विश्‍वेशतीर्थ स्वामीजी (मरणोत्तर) 

पद्मभूषण पुरस्कार :
एम. मुमताज अली 
सय्यद मुआज्जीम अली (मरणोत्तर) 
मुझफ्फर हुसैन 
अजय चक्रवर्ती (कला) 
दास (साहित्य आणि शिक्षण) 
बालकृष्ण दोषी (अभियांत्रिकी) 
कृष्णाम्मल जगन्नाथन (समाजसेवा) 
एस.सी.जमीर 
अनिल प्रकाश जोशी, (समाजसेवा) 
त्सेरिंग लॅंडोल (वैद्यकीय) 
आनंद महिंद्रा (व्यापार आणि उद्योग) 
नीळकंठ मेनन (मरणोत्तर) 
मनोहर पर्रीकर (मरणोत्तर) 
जगदीश सेठ (साहित्य आणि शिक्षण) 
पी. व्ही. सिंधू (क्रीडा) 
वेणू श्रीनिवासन (व्यापार आणि उद्योग)

तत्पूर्वी, क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल मुष्टियोद्धा मेरी कोम हिला 'पद्मविभूषण'ने सन्मानित केले जाणार आहे.  उद्योगपती आनंद महिंद्रा, बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आदींचा 'पद्मभूषण' पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे.

कला, सामाजिक कार्य, सार्वजनिक सेवा, विज्ञान, अभियांत्रिकी, व्यापार आणि उद्योग, वैद्यकीय सेवा, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा आदी क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांना 'पद्म' पुरस्कार जाहीर करण्यात आले. यंदा मार्च किंवा एप्रिल महिन्यामध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात येईल.

यंदा 141 जणांना पद्म पुरस्कार जाहीर झाले असून, काहींना संयुक्तपणे हे पुरस्कार देण्यात आले आहेत. सात जणांना पद्मविभूषण, सोळा जणांना पद्मभूषण आणि 118 जणांना पद्मश्री सन्मान जाहीर झाले. या पुरस्कार विजेत्यांमध्ये 34 महिलांचाही समावेश आहे. बारा जणांना मरणोत्तर हे पुरस्कार प्रदान केले जातील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder 5 KG पाच किलो एलपीजी सिलिंडरबाबत नवा नियम, खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

SCROLL FOR NEXT