Visa e sakal
देश

लॉकडाउनमुळे पाकिस्तानात जन्म, चिमुकला VISA वर पोहोचला भारतात

भाग्यश्री राऊत

नागपूर : लॉकडाउनमुळे (lockdown) पाकिस्तानमध्ये (Pakistan) अडकलेले कुटुंबीय शुक्रवारी भारतात परतले. मात्र, यावेळी १० महिन्यांच्या चिमुकल्याला व्हिसा (VISA) काढून भारतात प्रवेश करावा लागला. कारण, लॉकडाऊनच्या काळात त्याचा जन्म पाकिस्तानमध्ये झाला. त्यामुळे त्याला भारतातील वडिलांना भेटण्यासाठी व्हिसावर यावे लागले. (pak born 10 month old child reaches to indian father on visa)

रियांश असे या चिमुकल्याचे नाव असून तो जळगावातील कैलास उदासी यांचा मुलगा आहे. कैलास उदासी आणि त्यांची पत्नी सोन्या हे फेब्रुवारी २०२० मध्ये एका लग्न समारंभासाठी गेले होते. मात्र, कोरोनामुळे देशाच्या सीमा सील झाल्या. त्यामुळे त्यांची पत्नी ही पाकिस्तानमध्ये अडकली होती. त्यावेळी त्यांची पत्नी दोन महिन्याची गर्भवती होती. लॉकडाऊनमुळे भारतात येण्याचे सर्वच मार्ग बंद झाले होते. त्यामुळे त्यांना परतता आले नाही. त्यामुळे रियांशचा जन्म देखील पाकिस्तानमध्येच झाला. त्यांना आणण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले. यामध्ये सर्व कागदपत्रांची जुळवाजुळव करावी लागली. पण, रियांश हा पाकिस्तानमध्ये जन्मला. त्यामुळे तो आता व्हिसावर आपल्या वडिलांकडे पोहोचला आहे.

''शेवटी माझी पत्नी आणि मुलगा भारतात परतले आहेत. सुरुवातीला त्यांना पाकिस्तानमध्ये कोरोनाच्या निगेटिव्ह रिपोर्टची विचारणा करत थांबविण्यात आले. मात्र, आधी तशा सूचना दिल्या नव्हत्या. त्यामुळे इतरांकडेही कोरोनाचे रिपोर्ट नव्हते. त्यामुळे त्यांना सीमा ओलांडून भारतात येता आला. आपल्या देशाच्या सीमेवर फक्त रॅपिड अँटीजेन चाचणी केलीस असे कैलाशने टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT