Bilawal Bhutto
Bilawal Bhutto 
देश

Bilawal Bhutto in Goa: पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो गोव्याच्या दौऱ्यावर! जाणून घ्या डिटेल्स

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी हे गोव्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. या ठिकाणी शांघाई कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) समिट पार पडणार आहे. यामध्ये पाकिस्तानच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व बिलावल भुट्टो करणार आहेत. येत्या ४ आणि ५ मे रोजी ही समिट पार पडणार आहे. २०१४ मध्ये नवाज शरीफ यांच्यानंतर बिलावल भुट्टे हे पहिलेच पाकिस्तानी मंत्री आहेत.

यापूर्वी हिना रब्बानी खार या पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्री २०११ मध्ये भारताच्या दौऱ्यावर आल्या होत्या. त्यानंतर पाकिस्ताननं SCO समिटंचं भारताचं निमंत्रण जानेवारीत स्विकारलं. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या मार्फत इस्लामाबादमधील भारतीय दुतावासामार्फत हे निमंत्रण देण्यात आलं आहे. त्यानुसार आता ते गोव्यात होणाऱ्या समिटमध्ये सहभागी होणार आहेत.

शांघाई कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) समिटला जून २००१ मध्ये सुरुवात झाली. यामध्ये आठ पूर्ण सदस्य असून यामध्ये सहा देश संस्थापक देश आहेत. यामध्ये चीन, कझाकिस्तान, कझाकिस्तान, रशिया, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान यांचा समावेश आहे. पण नंतर २०१७ मध्ये भारत आणि पाकिस्तान हे दोन देश या संघटनेत संपूर्ण सदस्य बनले.

यंदाच २०२२-२३चं SCO समिटचं आयोजन भारताकडं असून यामध्ये सर्व देशांचे परराष्ट्र मंत्री उपस्थित राहतील अशी भारताला आशा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: Ram Naik: मुंबईतील कुलाबा येथील मतदान केंद्रावर सुरक्षा व्यवस्था वाढवली

Sakal Podcast : लोकसभेच्या पाचव्या टप्प्याचं आज मतदान ते रोहित शर्मा IPL ब्रॉडकास्टरवर भडकला

Loksabha Election : राज्यात आज अखेरचा टप्पा;मुंबई, नाशिकसह देशभरातील ४९ मतदारसंघांत मतदान

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 20 मे 2024

IPL 2024: अखेर साखळी फेरीची सांगता झाली अन् दुसऱ्या क्रमांकाची रस्सीखेच हैदराबादानं जिंकली

SCROLL FOR NEXT