Digvijay Singh
Digvijay Singh 
देश

"पाकला हेच हवंय"; दिग्विजय सिंहांच्या विधानावर भाजपची टीका

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी जम्मू आणि काश्मीरबाबत रद्द करण्यात आलेल्या कलम ३७० वरुन एक वादग्रस्त विधान केलं आहे. या विधानावर भाजपने आक्षेप घेतला असून काँग्रेसवर (Congress) सडकून टीका केली आहे. "पाकिस्तानला हेच तर हवं आहे," असं भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी म्हटलं आहे. (Pakistan must want this BJP criticizes over Digvijay Singhs statement)

सोशल मीडिया अॅप 'क्लबहाऊस'वरील संवादादरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्वीजय सिंह यांनी एका पाकिस्तानी पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटलं, "जर काँग्रेस पक्ष पुन्हा सत्तेत आला तर जम्मू आणि काश्मीरबाबतच्या कलम ३७० वर झालेल्या निर्णयाचा पक्षाकडून पुनर्विचार केला जाईल" क्लबहाऊसवरील या संवादाची ऑडिओ क्लीप लीक झाली असून ती भाजपचे अमित मालवीय यांनी ट्विटरवर शेअर केली आहे.

मालवीय यांनी क्लीप शेअर करताना म्हटलं, "क्लबहाऊस चॅटमध्ये राहुल गांधींचे टॉप सहकारी दिग्वीजय सिंह यांनी पाकिस्तानी पत्रकाराला सांगितलं की, जर काँग्रेस सत्तेत आली तर पक्षाकडून जम्मू-काश्मीरबाबतच्या रद्द करण्यात आलेल्या कलम ३७०वर फेरविचार करेल. खरंच? हेच तर पाकिस्तानला हवं आहे"

दिग्विजय सिंह नक्की काय म्हणाले?

कथीत ऑडिओ क्लीपमध्ये दिग्वीजय सिंह म्हणतात की, "केंद्र सरकारने कलम ३७० रद्द केल्यापासून काश्मीरमध्ये लोकशाही अस्तित्वात राहिलेली नाही. सरकारनं हे करताना सर्वांना तुरुंगात धाडलं त्यामुळं काश्मीरमध्ये इन्सानियत उरली नव्हती. तसेच काश्मिरीयत हा धर्मनिरपेक्षतेचा मुलभूत भाग आहे. कारण मुस्लीम बहुसंख्य राज्यात त्यावेळी हिंदू राजा राज्य करत होता आणि इथली मुस्लिम जनता आणि राजा मिळून काम करत होते. इतकंच नव्हे काश्मीरी पंडितांना सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणही देण्यात आलं होतं. त्यामुळे या राज्यातून कलम ३७० हटवणं हा खूपच वाईट निर्णय होता. काँग्रेस पक्ष या प्रश्नाकडे निश्चितच पुन्हा एकदा लक्ष घालेल." यावेळी एका पाकिस्तानी पत्रकारानं प्रश्न विचारला की, नरेंद्र मोदी सत्तेत नसतील तर काश्मीरबाबत भारताचं धोरणं काय असेल? यावर दिग्विजय सिंह यांनी पत्रकाराला या प्रश्नावर धन्यवाद देत म्हटलं "मोदींची सत्ता गेली आणि काँग्रेस सत्तेत आली तर जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० पुनर्प्रस्थापित करण्यात येईल"

दिग्विजय सिंह यांच्या या संवादाच्या व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लीपवर भाजपच्या इतरही अनेक नेत्यांनी टीका केली आहे. भाजप प्रवक्ते संबित पात्रा आणि केंद्रीय मंत्री हरदीपसिंह पुरी यांनीही टीका केलीए. पुरी यांनी म्हटलं की, "लोकशाही ही सध्याच्या सरकारमुळंच टिकून आहे. तसेच काही लोक आपल्या मुलांना परदेशात शिकायला पाठवून स्थानिक मुलांना मात्र हातात दगड उचलण्यास भडकवतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal : ''सुनीतासारखी बायको मिळाल्याबद्दल देवाचे आभार मानतो, माझ्यासारख्या...'' अरविंद केजरीवाल नेमकं काय म्हणाले?

Shikhar Dhawan Retirement: क्रिकेटला करणार गुडबाय? दुखापतीवर अपडेट देत शिखर धवन स्पष्टच बोलला...

Aishwarya Narkar: "हे तुम्हाला शोभतं का? असं म्हणू नका!"; ट्रोल करणाऱ्यांना ऐश्वर्या नारकरचं सडेतोड उत्तर

Pune Porsche Accident: पुणे अपघात प्रकरणातील विशाल अग्रवालसह इतरांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, जामीनाचा अर्ज मोकळा

Latest Marathi News Live Update : पुणे कार अपघात प्रकरणी आरोपींचा जामिनासाठी अर्ज दाखल

SCROLL FOR NEXT