kashmiri women 
देश

आम्हाला POK मध्ये पाठवा; पाकिस्तानी वंशाच्या काश्मिरी सुनांची मागणी

सकाळ डिजिटल टीम

श्रीनगर - पाकिस्तानव्याप्त काश्‍मीरमध्ये पाठविण्याची विनंती पाकिस्तानी वंशाच्या काश्मिरी सुनांनी सोमवारी सरकारकडे केली आहे. त्यांना भारताचे नागरिक समजले जात नसल्याचे कारण त्यांनी यासाठी दिले आहे. या महिलांचे पती पूर्वी दहशतवादी संघटनांशी संबंधित होते. नंतर सरकारच्या आत्मसमर्पण योजनेत त्यांनी शरणागती पत्करली व आता ते सामान्य जीवन जगत आहेत.

पत्रकार परिषदेत बोलताना त्या आज म्हणाल्या की, आम्हाला घरी जाण्याची परवानगी देण्याची लेखी मागणी पाकिस्तानच्या दूतावासाकडून भारतीय अधिकाऱ्यांनी दर महिन्याला करण्यात येते. कुटुंबाची भेट घेण्यासाठी आम्हाला घरी जाण्यास भारतीय सरकारने परवानगी द्यावी. येथील सरकार आम्हाला भारतीय नागरिक मानत नाही, मग आम्हाला आमच्या घरी का पाठवत नाही, असा सवाल त्यांनी केला. यासाठी आम्ही सगळ्यांची भेट घेतली, पण कुणीही आमच्या समस्येकडे लक्ष दिले नाही, असा दावा या महिलांनी केला.

जर मी काही चूक केली होती, तर माझा उमेदवारी अर्ज आधी का स्वीकारण्यात आला. आम्हाला भारताचे नागरिक समजले जात नसेल तर सरकारने आम्हाला पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये पाठवावे.
बुशेरा, पाकिस्तानी वंशाची काश्मिरी महिला 

मूळ पाकिस्तानी असलेली सोमिया सदफ या काश्मिरी सूनेने नुकतीच जम्मू-काश्‍मीरमध्ये झालेली निवडणूक लढविली होती. तिची उमेदवारी स्वीकारण्यात आली, पण आम्ही आमच्या प्रश्‍नांवर आवाज उठवला की कोणतेही कारण न देता सरकारने त्याठिकाणची मतमोजणी थांबविली, अशी तक्रार या महिलांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest: सीजेपीच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आले, पण घरी परतलेच नाहीत; शिवाजी पार्कात ७५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू

Puttu Recipe: इडली पात्रात बनवा चविष्ट 'पुट्टू'! केरळच्या घराघरांत बनणारा पौष्टिक पदार्थ; पाहा सोपी रेसिपी...

Tembhurni Crime : गाडी पार्किंगच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित आरोपींना अटक

Degloor Crime : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोर जेरबंद; १० चोरीच्या दुचाकींसह एक आरोपी ताब्यात, एक फरार

Badnapur News : ‘साहेब, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, जनावरांसाठी चारा द्या’; वरुडीतील शेतकऱ्यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आर्जवी मागणी

SCROLL FOR NEXT