Pakistani Boat apprehended in Indian waters gujrat with 10 crew carrying arms ammunition Narcotics worth Rs 300 crores  
देश

Gujrat ATS : नव्या वर्षात घातपाताचा प्रयत्न? हत्यारांसह १० पाकिस्तानींना अटक, कोट्यवधींचं ड्रग्जही जप्त

सकाळ डिजिटल टीम

गुजरातच्या समुद्रात तटरक्षक दल आणि एटीएसने मोठी कारवाई केली आहे. या करवाईत भारतीय तटरक्षक दल (ICG) ने ATS गुजरातच्या गुप्त माहितीच्या आधारे शस्त्रास्त्रे, दारूगोळा आणि 10 लोकांना घेऊन भारतीय हद्दीत आलेली पाकास्तानी बोट ताब्यात घेतली आहे. या जप्त करण्यात आलेल्या बोटीवरून ३०० कोटींचे ड्रग्ज आणि १० पाकिस्तानी नागरिकांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे.

ICG अधिकाऱ्यांनी सांगितले की, गुजरात एटीएसकडून एक पाकिस्तानी बोट भारतीय हद्दीत प्रवेश करत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. यानंतर, 25 आणि 26 डिसेंबरच्या रात्री एक ऑपरेशन करण्यात आले ज्यामध्ये IGC ने आपले जहाज अरिंजय पाकिस्तानच्या सागरी सीमारेषेवर तैनात केले होते.

यानंतर टीमने अल सोहेली नावाची पाकिस्तानी मासेमारी बोट अडवली. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून शस्त्र, दारूगोळा आणि 40 किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले. याची किंमत 300 कोटी रुपये अपेक्षित आहे. ICG ने पुढे माहिती दिली आहे की सध्या बोटीसह चालक दलाला पकडण्यात आले असून पुढील तपासासाठी ती ओखा येथे आणली जात आहे.

भारतीय तटरक्षक दल आणि ATS, गुजरात यांची गेल्या 18 महिन्यांतील ही सातवी संयुक्त कारवाई आहे आणि अंमली पदार्थांसह शस्त्रास्त्र आणि दारूगोळ्याच्या कथित तस्करीवरील पहिली कारवाई आहे. या कालावधीत 1930 कोटी रुपयांचे एकूण 346 किलो हेरॉईन जप्त करण्यात आले असून 44 पाकिस्तानी आणि 07 इराणी नागरिकांना अटक करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian student shot in USA : अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या!

Rohit Sharma: 'अद्भूत कर्णधार, टीम इंडियाला तू शिकवलंस की...' दिनेश कार्तिकचा रोहितच्या नेतृत्वाला सलाम; पाहा Video

30th Fenesta Open Tennis: महाराष्ट्राच्या वैष्णवी अडकरने जिंकले विजेतेपद; मनिष सुरेशकुमार पुरुष विभागात विजेता

सातारा अन् पालघर जिल्ह्यातील दोन न्यायाधीश सेवेतून बडतर्फ; नेमकं प्रकरण काय?

Phulambri Protest : शेतकऱ्यांच्या मदतीवरून काँग्रेस आक्रमक तहसीलदार व काँग्रेस कार्यकर्त्यांत बाचाबाची

SCROLL FOR NEXT