Pawan Kalyan Daughter Tirupati Balaji Temple Entry Esakal
देश

Pawan Kalyan Daughter: तिरुपती बालाजीचे दर्शन फक्त हिंदूंनाच घेता येते का? मंदिर प्रवेशापूर्वी उपमुख्यमंत्र्यांच्या मुलीकडून काय लिहून घेतले?

Pawan Kalyan Daughter Tirupati Balaji Temple: पवनकल्याण यांनी त्यांची अकरा दिवसांची प्रायश्चित्त दीक्षा पूर्ण केली. पवन कल्याण हे वाराही दीक्षेबद्दल गुरुवारी घोषणा करणार आहेत.

आशुतोष मसगौंडे

Tirumala temple's affidavit rule for non-Hindus:

आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी बुधवारी तिरुमला तिरुपती मंदिराला भेट देत व्यंकटेश्वराचे दर्शन घेतले. त्यांच्याबरोबर त्यांची मुलगी पलिना अंजनी कोनिडेला ही देखील होती.

माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या सरकारच्या काळात बालाजीच्या लाडूप्रसादासाठी वापरण्यात येणाऱ्या तुपामध्ये जनावरांची चरबी मिसळली जात असल्याचा आरोप करण्यात आल्यानंतर पवन कल्याण यांनी ११ दिवसांचे प्रायश्चित्त व्रत घेतले होते.

बालाजीचे दर्शन फक्त हिंदूंनाच घेता येते का?

पवन कल्याण यांची कन्या पलिना हिने भगवान व्यंकटेश्वरावर श्रद्धा असल्याचे प्रतिज्ञापत्र मंदिर समितीकडे सोपविले. त्यानंतर तिला मंदिरात प्रवेश करता आला.

पवन कल्याण यांची पत्नी मूळची रशिया येथील आहे. व्यवस्थापनाच्या नियमानुसार तिरुपती मंदिरामध्ये बिगर हिंदू किंवा परदेशी व्यक्तींना प्रवेश करायचा असल्यास त्यांनी त्यांची श्रद्धा असल्याचे प्रतिज्ञापत्राद्वारे मंदिर समितीला सादर करावे लागते. तो त्यामुळे पलिना हिने प्रतिज्ञापत्र सादर केले आहे.

जनसेना पक्षाने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, "तिरुमला येथे श्रीवरीचे (देवतेचे) दर्शन घेण्यापूर्वी, पलिना अंजनी कोनिडेला यांनी दर्शनासाठी घोषणापत्र दिले. त्यांनी टीटीडी कर्मचाऱ्यांनी दिलेल्या कागदपत्रांवर स्वाक्षरी केली. मात्र, सध्या पलिना अंजनी अल्पवयीन आहेत. त्यामुळे त्यांचे वडील पवन कल्याण यांनी मंदिराच्या सर्व कागदपत्रांना आपली सही करत संमती दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT