हुतात्मा संतोष बाबू याचे माता-पिता मंजुला-उपेंद्र. 
देश

‘परमवीरचक्र मिळायला हवे होते’

सकाळन्यूजनेटवर्क

हैदराबाद - गलवान खोऱ्यात चीनविरुद्धच्या संघर्षातील हुतात्मा कर्नल संतोष बाबू यांना परमवीरचक्र मिळायला हवे होते, अशी भावना त्यांच्या माता-पित्याने व्यक्त केली आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येस १६ बिहार रेजीमेंटमधील कमांडिंग ऑफिसर संतोष बाबू यांना महावीरचक्र मरणोत्तर जाहीर करण्यात आले. त्याविषयी पिता बी. उपेंद्र यांनी सांगितले की, आम्हाला आनंद झाला नाही असे नाही, पण महावीरचक्रमुळे आमचे शंभर टक्के समाधान झालेले नाही.

माझ्या मुलाचा आणखी चांगल्या पद्धतीने सन्मान करण्यास वाव होता, कारण आपले कर्तव्य बजावताना त्याने प्रदर्शित केलेले शौर्य पाहता परमवीरचक्रच्या रूपाने सर्वोच्च लष्करी सन्मान त्याला मिळायला हवा होता. त्याच्या पराक्रमामुळे अनेक लोक प्रेरित झाले आहेत, ज्यात संरक्षण दलांत काम करणाऱ्यांचाही समावेश आहे. त्यांच्या धैर्यामुळे शत्रू देशांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वीरपत्नी संतोषी उपजिल्हाधिकारी
उपेंद्र पुढे म्हणाले की, तब्बल २१ वर्षांनी तेलंगणच्या सुपुत्राला महावीरचक्रसारखा सन्मान मिळाला आहे आणि ही आमच्या अभिमानाची गोष्ट आहे.  दरम्यान, संतोष बाबू यांची पत्नी संतोषी यांना तेलंगण सरकारने उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्त केले आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यपाल तमिलीसाई सौंदरराजन यांच्याहस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थाट... देवदत्त पडिक्कल, विराट कोहलीची दमदार फटकेबाजी; हैदराबादवर विक्रमी विजय

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

SCROLL FOR NEXT