नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात बोलत असून त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून काही विद्यार्थ्यांशी आणि शिक्षकांसोबत संवाद साधला. यावेळी डिजिटल माध्यमातून परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या महिन्यात शिक्षण मंत्रालयाने हा कार्यक्रम होणार असल्याचं सांगितलं होतं. तीन वर्षांपासून मोदी परीक्षा पे चर्चा कार्यक्रमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत. विद्यार्थ्यांवर असलेला ताण कमी करण्यासाठी पंतप्रधान मोदी या कार्यक्रमातून परीक्षेच्या आधी विद्यार्थ्यांशी संवाद साधतात आणि त्यांना तणावमुक्त राहण्यासाठी मार्गदर्शन करतात.
परीक्षा पे चर्चा कार्यक्रमातून विद्यार्थ्यांशी संवाद करताना मोदी म्हणाले की, कोरोनामुळे मला पहिल्यांदा एका नव्या माध्यमातून तुमच्यासमोर यावं लागत आहे. तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहता न येणं हे माझं खूप मोठं नुकसान आहे. परीक्षा पे चर्चा ही फक्त परीक्षेवरची चर्चा नसून विद्यार्थ्यांसाठी मोकळं वातावरण तयार करणं आहे. विद्यार्थ्यांना तणामुक्त करायचं आहे. जसं आपण मित्रांसोबत राहतो, बोलतो तसा संवाद साधायचा आहे.
परीक्षेच्यावेळी भीती आणि तणाव मुक्त करण्यासाठी मोदींनी काही टिप्सही दिल्या. परीक्षा होणार आहे याची माहिती आपल्याला आधीपासून असते. अचानक होत नाही. जी गोष्ट आपल्याला वर्षभर आधीच माहिती असते त्याची कशाला भीती बाळगायची. भीती परीक्षेची नाही तर त्याच्या वातावरणाची आहे. परीक्षा खूप महत्त्वाची असते असं जे काही वातावरण तुमच्या सभोवताली तयार करण्यात आलेलं असतं त्याची भीती असते.
मुलांच्या मनात परीक्षेची भीती निर्माण करणं योग्य नाही असाही सल्ला मोदींनी पालकांना दिला. आयुष्यात परीक्षा ही काही शेवटची नाही. परीक्षा हा आयुष्यातला एक टप्पा आहे. त्यासाठी दबाव टाकू नये. मुलांसोबत घरात सहज आणि मोकळं वातावरण असायला हवं असंही मोदी म्हणाले . आई वडिल मुलांसोबत मोकळेपणानं बोलायचे. पण अलिकडे मुलांचे करिअर आणि अनेक पर्याय यामुळे मुलांच्या क्षमतेची माहिती नसते. मुलांची क्षमता ओळखण्यासाठी पालक परीक्षेचा निकाल बघतात. मुलांवर परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी दबाव निर्माण होतो असेही मोदींनी सांगितले.
मोदी म्हणाले की, स्वप्नं बघणं चांगली गोष्ट आहे. फक्त ती बघत बसणं, झोप काढणं चांगलं नाही. तुम्ही विचार केला पाहिजे की कोणतं स्वप्न तुमच्या आयुष्याचं ध्येय असायला हवं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.