Parle G clocks best sales in 8 decades; maker's market share increases 
देश

कोरोना महामारीचा असाही फायदा; पारले कंपनीची 8 दशकांतील विक्रमी कमाई

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी टाळेबंदी लागू करण्यात आली. त्यामुळे अनेकांचे उद्योगधंदे बुडाले आहेत. मात्र, टाळेबंदीच्या काळात पारले-जी कंपनीला प्रचंड फायदा झाला आहे. टाळेबंदीच्या काळात कंपनीला गेल्या 8 दशकातील सर्वाधिक फायदा झाल्याचं पारलेकडून सांगण्यात आलं आहे. कोरोनामुळे अनेक कंपन्यांचे कंबरडे मोडले असताना पारले कंपनीने विक्रमी नफा कमावला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

कंपनीकडून याची आकडेवारी जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, या वर्षी मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात कंपनीने 8 दशकातील सर्वाधिक कमाईची नोंद केली आहे, असं कंपनीने सांगितलं आहे. पारले-जी 1938 पासून बिस्किट निर्मितीच्या उद्योगात आहे. तेव्हापासून पारले-जी बिस्किटाची लोकप्रियता वाढतच गेली आहे. पारले-जी कंपनीने बिस्किटांची किंमतही सर्वसामान्यांना परवडेल अशी ठेवली आहे. पाच रुपयांना पारले-जीचा बिस्किटपुडा येतो. टाळेबंदीच्या काळात या बिस्किटांची विक्री मोठ्या प्रमाणात वाढली. 
-----------
जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा दोन दहशतवाद्यांचा खात्मा; आठवड्याभरात ११ ठार
-----------
धक्कादायक! आमदाराचा कोरोनामुळे मृत्यू
----------
फेक बातम्यांच्या धर्तीवर सरकारच करणार आता फॅक्ट चेक; कसं ते वाचा?
-----------
टाळेबंदीच्या काळात अनेल लोकांच्या हातचा रोजगार गेला. टाळेबंदी अचानक लागू झाल्याने अनेकांना पैशांची जुळवाजुळव करणे शक्य झाले नाही. अशावेळी मजूर, कामगार आणि श्रमिकांनी कमी पैशात पोट भागवण्यासाठी पारले-जी बिस्किटांची निवड केली. तसेच अनेक शहरे आणि गावांमध्ये पारले-जी बिस्किटपुडे वाटण्यात आले होते. त्यामुळेही गेल्या तीन महिन्यात कंपनीला मोठा फायदा झाला आहे. 

पारले कंपनीचा मार्केट शेअर 5 टक्क्यांनी वाढला आहे आणि यातील 80 ते 90 टक्के वाढ ही पारले-जी बिस्किटांच्या विक्रीमुळे झाली असल्याची माहिती कंपनीचे उत्पादन प्रमुख मयंक शाह यांनी दिली आहे. टाळेबंदीच्या काळात अनेकांनी पारले बिस्किट खाण्यास पसंती दिली. खाण्याची व्यवस्था न झाल्यास अनेकांनी नाष्टा किंवा जेवण म्हणून पारले बिस्किटेच खाली. काही राज्यांनी आम्हाला उत्पादन वाढवण्याची विनंती केली होती. तसेच अनेक एनजीओ कंपन्यांनी गरीबांना वाटण्यासाठी म्हणून पारले बिस्किटांची खरेदी केली, असं शाह म्हणाले आहेत.

पारले कंपनीचे देशभरात 130 कारखाने आहेत, त्यातील 120 कारखाण्यांमध्ये दिवसरात्र उत्पादन होत असते. दरम्यान, टाळेबंदीच्या काळात अन्य बिस्किट कंपन्यांनाही फायदा झाला आहे. ब्रिटानिया कंपनीनेही चांगला नफा कमावला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiv Sena Symbol Dispute : दोन्ही गटांना नवे नाव, चिन्हे का दिली नाहीत? शिवसेना पक्षाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

India ODI Squad : भारताच्या वनडे संघात Rishabh Pant ला का मिळाली नाही संधी? ही असू शकतात ३ महत्त्वाची कारणं

Latest Marathi News Update : मनोज जरांगे यांनी उपोषण सोडल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच म्हणाले...

Gokul Milk Union : गोकुळमधील अवसायनातील संस्थांना दिलासा, सर्वोच्च न्यायालयातील याचिका फेटाळली; ४९२ संस्थांचा मतदानाचा अधिकार कायम

‘देवमाणूस’नंतर किरण गायकवाडची नवी इनिंग; राजकारण अन् गुन्हा… ‘एफआयआर नं. ४६९’मध्ये नेमकं काय पाहायला मिळणार?

SCROLL FOR NEXT