Firefighters battle a massive blaze at the Parliament apartment complex inaugurated by Prime Minister Narendra Modi, which houses several Members of Parliament.

 

esakal

देश

fire in apartment at Parliament area : मोदींच्या हस्ते उद्घाटन झालेल्या अन् अनेक खासदारांची निवासस्थानं असलेल्या संसदभवन परिसरातील अपार्टमेंटला भीषण आग!

Apartment Catches Fire Near Parliament : आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाच्या १४ गाड्या झाल्या दाखल

Mayur Ratnaparkhe

Massive fire breaks out at the apartment which inaugurated by PM Modi :नवी दिल्लीतील संसद परिसरापासून अवघ्या २०० मीटर अंतरावरील कावेरी अपार्टमेंटमध्ये भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाला आगीबाबत माहिती मिळाल्यानंतर आग आटोक्यात आणण्यासाठी १४ गाड्या पाठवण्यात आल्या होत्या.

२०२० मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या इमारतीचे उद्घाटन केले होते.  विशेष म्हणजे या अपार्टमेंटमध्ये अनेक खासदार राहतात अपार्टमेंटमध्ये आग लागल्याची बातमी कळताच सर्वत्र एकच घबराट पसरली. यानंतर आग आटोक्यात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू झाले. बराचवेळानंतर ही आग आटोक्यात आणली गेल्याची माहिती समोर आली आहे.

प्राप्त माहितीनुसार, हे अपार्टमेंट देखील एक व्हीआयपी इमारत मानले जाते. लोकसभा आणि राज्यसभेचे अनेक खासदारांचे येथे निवासस्थान आहे आणि संसद भवनापासून फक्त २०० मीटर अंतरावर आहेत. सुदैवावे या दुर्घटनेत आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

मात्र स्थानिक रहिवाशांचा आरोप आहे की अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहचण्यास खूप उशीर केला. तर, विभागाने असे कोणतेही आरोप फेटाळले आहेत. आग चौथ्या मजल्यावर पोहोचली होती आणि अग्निशमन दलाने ती आटोक्यात आणली आहे. नुकसानीचे प्रमाण अद्याप निश्चित झालेले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akhilesh Yadav VIDEO : "दिवे अन् मेणबत्त्यांवर पैसा का खर्च करायचा?, ‘ख्रिसमस’ मधून शिका" ; अयोध्या दीपोत्सवाच्या पूर्वसंध्येस अखिलेश यादव यांचं वादग्रस्त विधान!

Bus Accident :भीषण अपघात! चालकाचे नियंत्रण सुटले अन् बस खडकावर आदळली, १५ जणांचा मृत्यू

Air India flight malfunction : 'एअर इंडिया'च्या विमानात बिघाड; सणासाठी निघालेले २५५ भारतीय अडकले परदेशात!

AUS vs IND: ऑस्ट्रेलियाचा प्लॅन झाला! भारताचा सामना करण्यासाठी पहिल्या वनडेसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन नव्या खेळाडूंना संधी

Boat Capsizes: दुर्दैवी! १४ भारतीय नागरिकांना घेऊन जाणारी बोट उलटली, ३ जणांचा मृत्यू, तर...; घटनेनं हळहळ

SCROLL FOR NEXT