Parliament Monsoon Session: 
देश

Parliament Monsoon Session: पावसाळी अधिवेशनापूर्वी आज सर्वपक्षीय बैठक, मोदीही उपस्थित राहणार, 'हे' मुद्दे गाजणार

Sandip Kapde

Parliament Monsoon Session:  केंद्र सरकारने २० जुलैपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनापूर्वी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारने आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.

संसदेचे अधिवेशन सुरू होण्याच्या एक दिवस आधी ही औपचारिक बैठक होणार आहे. या बैठकीत सरकारच्या वरिष्ठ मंत्र्यांसह पंतप्रधान मोदीही सहभागी होणार आहेत.

यापूर्वी ही बैठक राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांनी मंगळवारी बोलावली होती. परंतु बहुतांश पक्षांचे नेते उपस्थित न राहिल्याने ही बैठक पुढे ढकलण्यात आली होती. (latest marathi news)

विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक जोरदार तयारीला लागले आहेत. विरोधकांनी काल बंगळुरू तर विरोधकांनी दिल्लीत बैठक घेतली.

'हे' मुद्दे गाजणार-

पावसाळी अधिवेशन वादळी होण्याची शक्यता आहे. पुढील वर्षी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधक सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेणार आहेत. यासोबतच विरोधी पक्ष महागाई, मणिपूर संकट या मुद्द्यांवरून सरकारवर निशाणा साधू शकतात. संसदेच्या हिवाळी अधिवेशनातही गदारोळ झाला होता.

भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह, बालोसोर रेल्वे अपघात, देशात वाढते अपघात, पुरपरिस्थीती, हे मुद्दे पावसाळी अधिवेशनात गाजण्याची शक्यता आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT