Parliament winter Session 2023 visitor jumped into LS chamber from gallery was seen leaping over benches  
देश

Parliament Security Breach: एकमेकांना ओळखतात, नियोजनबद्ध पद्धतीनं केलं काम; पोलिसांची खळबळजनक माहिती

संसदेत घुसखोरांनी उडवलेल्या स्मोक क्रॅकरमुळं खळबळ उडाली आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : संसदेत घुसखोरांनी उडवलेल्या स्मोक क्रॅकरमुळं खळबळ उडाली आहे. यामध्ये सहा जणांचा सहभाग असल्याचं उघड झालं आहे. पण या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे. हे सर्व नियोजनबद्ध पद्धतीनं केलं गेल्याचं पोलीस सुत्रांच्या हवाल्यानं पीटीआयनं म्हटलं आहे. (Parliament security breach well planned 6 accused knew each other says Police sources)

संसदेत घुसून स्मोक क्रॅकर उडवले

पीटीआयच्या वृत्तानुसार, संसदेची सुरक्षा भेदण्याची योजना नियोजनबद्ध पद्धतीनं करण्यात आला होती. या प्रकरणात सहभागी असलेले सर्व ६ जण हे गेल्या चार वर्षांपासून एकमेकांना ओळखत असून त्यांनी काही दिवसांपूर्वीच संसदेत घुसून स्मोक क्रॅकर उडवायचा प्लॅन केला होता. (Latest Marathi News)

देशातील विविध भागातील तरुणांचा समावेश

दरम्यान, पोलिसांनी या सहा जणांपैकी ५ जणांचा अटक केली असून यामध्ये एका महिलेचा समावेश आहे. यांपैकी एक जण हरयाणा, दुसरा कर्नाटक, तिसरा महाराष्ट्र त्यानंतर एक पंजाबची तरुणी आणि इतर दोघे अशा देशातील विविध भागातील रहिवासी असलेल्या तरुणांचा समावेश आहे. (Marathi Tajya Batmya)

संसदेत काय घडलं?

संसदेत लोकसभेत चर्चा सुरु असताना बुधवारी, १३ डिसेंबर २०२३ रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास एक खळबळजनक घटना घडली. यामध्ये दोन तरुण गॅलरीत लटकून खाली उतरले आणि त्यांनी स्मोक क्रॅकर्स उडवले. अचानक घडलेल्या याप्रकारामुळं संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेवर मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune : गांधीजींच्या पुतळ्याचं डोकं उडवण्याचा प्रयत्न, एकाला अटक; काँग्रेस करणार आंदोलन

Raigad Suspicious Boat : अलिबागजवळ समुद्रात आढळलेली संशयास्पद बोट बेपत्ता, सुरक्षा यंत्रणा अलर्टवर; हेलिकॉप्टरद्वारे शोध सुरु

Navi Mumbai : APMC मार्केटजवळ भीषण आग, १० पेक्षा जास्त ट्रक, टेम्पो जळून खाक

Bus-Car Accident : कोल्हापुरातून महालक्ष्मीचं दर्शन घेऊन परतताना भीषण अपघात; बस-कारच्या धडकेत चौघे ठार, एक जण जखमी

Panchang 7 July 2025: आजच्या दिवशी ‘सों सोमाय नमः’ या मंत्राचा किमान 108 जप करावा

SCROLL FOR NEXT