Finance Minister Nirmala Sitharaman esakal
देश

Nirmala Sitharaman : अर्थसंकल्पावर टीका करणाऱ्यांना सीतारामन यांनी सुनावलं; म्हणाल्या, त्यांना नैतिक अधिकार..

1 फेब्रुवारी रोजी निर्मला सीतारामन यांनी 2023-2024 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सभागृहात सादर केला होता.

सकाळ डिजिटल टीम

शपथ घेतल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलवर व्हॅट लावल्याबद्दल अर्थमंत्र्यांनी हिमाचल प्रदेशच्या नवनिर्वाचित काँग्रेस सरकारवर निशाणा साधला.

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी आज (शुक्रवार) लोकसभेत 2023-2024 च्या सर्वसाधारण अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर दिलं.

1 फेब्रुवारी रोजी निर्मला सीतारामन यांनी 2023-2024 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सभागृहात सादर केला होता. हा अर्थसंकल्प मोदी सरकारच्या चालू कार्यकाळातील शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प होता.

लोकसभेत 2023-24 च्या सर्वसाधारण अर्थसंकल्पावरील (Budget) चर्चेदरम्यान अर्थमंत्री सीतारामन यांनी अर्थसंकल्पाच्या वैशिष्ट्यांवर प्रकाश टाकला. 2023-24 च्या अर्थसंकल्पाबद्दल बोलताना अर्थमंत्री म्हणाल्या, भारतीय अर्थव्यवस्था अजूनही सर्वात वेगानं वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था आहे. 2023-24 मध्येही ती तशीच राहील.

सीतारामन यांनी लोकसभेत सांगितलं की, 2023-24 च्या अर्थसंकल्पाचा काही शब्दांत सारांश सांगितला तर ते आर्थिक विवेकाच्या मर्यादेत राहून भारताच्या विकासाच्या गरजा संतुलित करतं. राज्यांसाठीही पुरेशी संसाधनं वाटप करण्यात आली आहेत. राज्यांना 1.3 लाख कोटी रुपये व्याजाशिवाय वाटप करण्यात आलं आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

काँग्रेसला भ्रष्टाचारावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. काँग्रेस सरकार विचार न करता पावलं उचलतं. शपथ घेतल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलवर व्हॅट लावल्याबद्दल अर्थमंत्र्यांनी हिमाचल प्रदेशच्या नवनिर्वाचित काँग्रेस सरकारवर निशाणा साधला. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी गेल्या वर्षीचा अर्थसंकल्प वाचताना म्हटलं की, हे कोणाच्याही बाबतीत होऊ शकतं. अशी चूक कोणीही करू शकतं, पण तसं होता कामा नये, असंही त्यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russia Ukraine Ceasefire : रशिया-युक्रेन युद्धबंदीच्या ठरावादरम्यान भारत अनुपस्थित, अमेरिकेनीही घेतला नाही सहभाग; झेलेन्स्कींना झटका !

T20 World Cup: पराभवानंतर भारतीय क्रिकेट संघाची देहबोली बदलली; सरावातही लक्षणीय बदल

Holi 2026: बरसाना विसरा! 'या' गावात महिला मारतात लाठ्या आणि पुरुष नाचतात साडी नेसून; लट्ठमार होळीचे हे ठिकाण माहीत आहे का?

Kolhapur Corporaters Dispute : कोल्हापूर महापालिकेत शारंगधर देशमुख-आदिल फरास यांच्यात जोरदार वाद, टेबल आपटण्याचा प्रकार; महापौरांनी केला हस्तक्षेप

UP Police: पोलिसांचा थरार! 'गो-तस्कर' कमरे हसनचा हाफ एन्काउंटर; अंधाराचा फायदा घेऊन ६ साथीदार पळाले

SCROLL FOR NEXT