Women Reservation Bill 
देश

Women Reservation Bill: महिला आरक्षणासाठी घटनेत दुरुस्ती करणार; PM नरेंद्र मोदींची मोठी घोषणा

Sandip Kapde

Women Reservation Bill: नव्या संसद भवनात लोकसभेचे कामकाज सुरू झाले आहे. नवीन संसद भवनात आपल्या पहिल्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी मोठी घोषणा केली. केंद्रीय कॅबीनेटमध्ये महिला आरक्षणासाठी विधेयक मंजूर करण्यात आले.

दरम्यान आज हे विधेयक सभागृहात मांडण्यात येणार आहे. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभागृहात आपली भूमिका स्पष्ट केली. महिला आरक्षणासाठी घटनेत दुरुस्ती करणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.  

नवीन संसदेतील आपल्या पहिल्या भाषणात पंतप्रधान मोदी म्हणाले की, महिलांसाठी इतिहास घडवण्याची हीच वेळ आहे. महिला आरक्षणावर बरीच चर्चा झाली. महिला आरक्षण विधेयकाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. आज आपले सरकार संविधान दुरुस्ती विधेयक मांडणार आहे. महिलांना लोकसभा आणि विधानसभेत आरक्षण मिळेल. महिला आरक्षण विधेयक अनेकदा मांडण्यात आले, पण अनेक पवित्र कामांसाठी देवाने माझी निवड केली आहे.

नरेंद्र मोदी म्हणाले, चांद्रयान-3 च्या यशाचा भारताला अभिमान आहे. नव्या संकल्पाने आम्ही संसद भवनात आलो आहोत. कटुता विसरून पुढे जायचे आहे. ही इमारत नवीन आहे. सर्व व्यवस्था नवीन आहेत. सर्व काही नवीन आहे, परंतु काल आणि आज जोडणारा एक मोठा वारसा आहे जो नवीन नाही, जुना आहे.

नारी शक्ती वंदन अधिनियम -

महिला आरक्षणाबाबत नरेंद्र मोदी संसदेत म्हणाले, "महिला आरक्षणाबाबत यापूर्वीही संसदेत प्रयत्न झाले आहेत. आज आपले सरकार संविधान दुरुस्ती विधेयक मांडणार आहे. महिलांना लोकसभा आणि विधानसभेत आरक्षण मिळेल. हे विधेयक कायदा झाल्यावर त्याची ताकद आणखी वाढेल."

"मी दोन्ही सभागृहांच्या खासदारांना आवाहन करतो की तो सर्वांच्या संमतीने मंजूर करावा. आज महिला प्रत्येक क्षेत्रात पुढे जात आहेत. धोरणनिर्मितीत महिलांची भूमिका असायला हवी. तसेच, पंतप्रधान मोदींनी नारी शक्ती वंदन अधिनियमाबद्दल अभिनंदन केले. महिला आरक्षण विधेयक नारी शक्ती वंदन अधिनियम म्हणून ओळखले जाईल," असे मोदी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT