Winter Session esakal
देश

Winter Session : संसदेचं अधिवेशन एक दिवस आधीच गुंडाळलं; विरोधकांशिवाय 'एवढे' विधेयकं मंजूर

संसदेचे हिवाळी अधिवेशन गुरुवारी संस्थगित करण्यात आले. या अधिवेशनात संसदेतील युवकांची घुसखोरी, जवळपास दीडशे खासदारांचे निलंबन व महत्त्वपूर्ण १८ विधेयके मंजूर करण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : संसदेचे हिवाळी अधिवेशन गुरुवारी संस्थगित करण्यात आले. या अधिवेशनात संसदेतील युवकांची घुसखोरी, जवळपास दीडशे खासदारांचे निलंबन व महत्त्वपूर्ण १८ विधेयके मंजूर करण्यात आली. बहुतेक विधेयके हे विरोधकांच्या अनुपस्थितीत मंजूर करण्यात आली.

गेल्या ४ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशनाला सुरूवात झाली. संसदेचे हे १४ वे सत्र होते. यात १४ दिवस कामकाज झाले. याकाळात कामकाज ६१ तास ५० मिनिटे चालले. कामकाजाची टक्केवारी ७४ टक्के होती. या गेल्या १३ डिसेंबरला दोन युवकांनी लोकसभेच्या प्रेक्षक दीर्घेतून उडी मारून धूरकांडे फोडून संसदेची सुरक्षा भेदली.

यानंतर विरोधकांचा जवळपास कामकाजावर बहिष्कार राहिला. विरोधकांनी निवेदन करण्याची मागणी लावून धरल्याने लोकसभा व राज्यसभेतील १४९ खासदारांना या सत्रासाठी निलंबित करण्यात आले. तसेच १४ खासदारांच्या वर्तणुकीबद्दल विशेषाधिकार समितीकडे प्रकरण सोपविले आहे. संसदीय इतिहासातील ही अभूतपूर्व घटनाही याच अधिवेशनात घडली.

महत्त्वपूर्ण विधेयके

अधिवेशनात काही महत्त्वपूर्ण विधेयके संमत करण्यात आली. यात फौजदारी कायद्यांमध्ये आमूलाग्र बदल करणारे तीन विधेयके याशिवाय जम्मू व काश्मीरच्या संदर्भात दोन विधेयके, निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीबद्दल, प्रेस कायद्याबद्दल, दूरसंचार विधेयकांचा समावेश आहे. विरोधकांच्या सततच्या बहिष्कारामुळे २२ डिसेंबरला संपणारे अधिवेशन २१ डिसेंबरलाच संस्थगित करण्यात आले.

मोदी-बिर्ला यांची भेट

अधिवेशन स्थगित झाल्यानंतर गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी खासदारांच्या वर्तनाबद्दल चिंता व्यक्त केली. विरोधकांनी संसदीय मूल्ये न पाळल्याने निलंबित व्हावे लागल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला. तसेच संसदेच्या सुरक्षेच्या संदर्भात सुद्धा अधिक कठोर उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याची सूचना त्यांनी यावेळी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नातेवाईक नाहीत, आधार नाही; शेवटच्या प्रवासाची चिंता मिटवण्यासाठी वृद्धाने केलं स्वतःचं श्राद्ध

“मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचं व्हिजन ऐकतो” सिनेमा निवडण्यावर सलमानचा खुलासा

Best Mileage Bikes : कमी पेट्रोलमध्ये जास्त चालतात 'या' 5 दमदार बाईक्स; सर्वाधिक मायलेज अन् किंमत लाखाच्या आतच

वल्लरीचा खोटेपणा उघड होणार? तू हि रे माझा मितवा मधील ट्विस्टने प्रेक्षक चकित

Latest Marathi News Live Update : पुण्यात पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांचा शोध तीव्र

SCROLL FOR NEXT