Parrikar should resign from CM's post: Vijay Bhike
Parrikar should resign from CM's post: Vijay Bhike 
देश

पर्रिकरांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा : विजय भिके

सकाळवृत्तसेवा

पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना वारंवार मुंबई व अमेरिकेत उपचारासाठी जावे लागत असल्याने त्यांचा हा आजार किती गंभीर आहे हे जनतेला कळून चुकले आहे. त्यामुळे लोकांची दिशाभूल न करता त्यांच्या या आजाराची सत्यपरिस्थिती भाजपने येत्या 24 तासात उघड करावी. हुकूमशाहीप्रमाणे न वागता मुख्यमंत्र्यांनी पदाचा राजीनामा देऊन पूर्णवेळ पर्यायी मुख्यमंत्री नेमावा. भाजपने ही माहिती उघड न केल्यास रस्तावर आंदोलन केले जाईल असा इशारा उत्तर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष विजय भिके यांनी आज दिला.

पणजीत काँग्रेस भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना भिके म्हणाले, मुख्यमंत्री पर्रिकर हे 'कन्सल्टेशन' करिता अमेरिकत गेले आहेत असे सांगितले जाते. तर भाजपने त्यांना अपचनाची समस्या असल्याने ते मुंबईतून अमेरिकेत उपचारासाठी जाणार आहे असे स्पष्टीकरण दिले होते. त्यांच्यावरील वैद्यकीय उपचारासंदर्भातची अधिकृत माहिती भाजपकडून उघड न करता ती गोपनीय ठेवली जात आहे. त्यांच्या अनुपस्थितीत राज्य प्रशासन ठप्प झाले असल्याने जनतेला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पहिल्यांदा अमेरिकेत उपचारासाठी जाण्यापूर्वी त्यांनी मंत्रिमंडळ त्रिसदस्यीय सल्लागार समिती नियुक्त केली होती ती घटनाबाह्य होती. या समितीला कोणतेच अधिकार नव्हते तर ते विदेशातून सर्व निर्णय घेत होते.

राज्याचा अर्थसंकल्प त्यांनी 'शॉर्टकट' पद्धतीने विधानसभेत मांडला होता त्यामुळे विधानसभा घटनेनुसार चालते की ते स्वतःच चालवितात असा प्रश्‍न उपस्थित होतो, असे भिके म्हणाले. 

राज्यातील लोकांनी त्यांना सत्तेवर आणले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पद न सोडता त्यांच्या भावनांशी खेळू नये. लोकांच्या समस्या वाढत आहेत मात्र त्यावर ठोस निर्णय घेण्यासाठी प्रशासनला मरगळ आली आहे. राज्याचा मुख्यमंत्री हा बहुजन समाजाचा होऊ नये यासाठी पर्रिकर हे मुख्यमंत्री पद सोडण्यास तयार नाहीत असा आरोप करून भिके म्हणाले की, ते इतके लोभी व स्वार्थी बनले आहेत की ते दाबोळी विमानतळावर आल्यावर त्यांनी केंद्रीयमंत्र्यांकडून माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा अस्थिकलश घेऊन येऊन सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला.

काँग्रेसलाही अटल बिहारी वाजपेयींबाबत आदर आहे. म्हणूनच त्यांचा श्रद्धांजली कार्यक्रम केला. मात्र भाजपने या अस्थिकलशाची राज्यभर फेरी काढून राजकारण केले अशी टीका त्यांनी केली. मुख्यमंत्री पर्रीकर यांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पद सोडून पर्यायी व्यवस्था करावी असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री हट्टी व हुकूमशहा!

दोन मंत्री फ्रांसिस डिसोझा व पांडुरंग मडकईकर आजारी आहेत व स्वतः पर्रीकर हेही आजारी असल्याने पर्यायी मुख्यमंत्र्यांची राज्याला आवश्‍यकता असूनही ते त्याबाबत राजी नाहीत. मुख्यमंत्री पर्रिकर हे हट्टी, स्वार्थी, हेकेखोर व हुकूमशाहीप्रमाणे वागत आहे. लोकांच्या हिताच्या दृष्टीने पर्रिकरांनी लोकशाहीची थट्टा न करता त्यांनी पद न सोडण्याचा अट्टाहास बाजूला ठेवावा. आजारातून पूर्ण बरे झाल्यावर पुन्हा त्यांनी मुख्यमंत्रीपद सांभाळावे.
- विजय भिके, उत्तर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT