Parvo Virus in Dogs Sakal
देश

कोरोनाप्रमाणे कुत्र्यांमध्ये पसरतोय 'पार्वो' व्हायरस; श्वानप्रेमी चिंतेत

पार्वो व्हायरस कुत्र्यांच्या पोट आणि आतड्याला संक्रमित करत आहे.

सकाळ डिजिटल टीम

उदयपूर आणि राजस्थानच्या आसपासच्या भागात कोरोनाप्रमाणेच कुत्र्यांमध्ये 'पार्वो व्हायरस' खूप वेगाने पसरत आहे. ज्याप्रमाणे एकमेकांच्या संपर्कात आल्यावर एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीत पसरत होता अगदी त्याचप्रमाणे पार्वो विषाणू कुत्र्यांमध्ये पसरत आहे. कुत्र्यांच्या पोट आणि आतड्याला हा विषाणू संक्रमित करत आहे. त्यामुळे कुत्र्यांचे खाणं पिणं बंद होत असून कुत्रे भुकेने मरत आहेत. या नव्या व्हायरसमुळे श्वानप्रेमी चिंतेत आहेत. ('Parvo' virus spreads in dogs like corona; Dog lovers worried)

पशुवैद्यांच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंतच्या तपासणीत चांगली गोष्ट समोर आली आहे की, हा विषाणू फक्त कुत्र्यांनाच संक्रमित करत आहे. बैल, बकरी, गाय, घोडा, उंट असे इतर सर्व प्राणी पूर्णपणे सुरक्षित आहेत. उदयपूरच्या चेतक सर्कलमध्ये असलेल्या सर्वात मोठ्या पशुवैद्यकीय रुग्णालयातील डॉ. संजय जैन सांगतात की, १५ मार्चनंतर रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या कुत्र्यांची संख्या अचानक सहा पटीने वाढली आहे. श्वानप्रेमी रस्त्यावरील काही कुत्र्यांना उपचारासाठी आणत आहेत, मात्र अनेक बेवारस कुत्र्यांचा मृत्यू होत आहे.

दवाखान्यात राहूनही जीव वाचवणे कठीण-

रुग्णालयात आणल्या जाणाऱ्या कुत्र्यांचा जीव वाचवणेही कठीण होत असल्याचे पशुवैद्यांचे म्हणणे आहे. प्रकृती ढासळल्याने आता पाळीव कुत्र्यांना तातडीने रुग्णालयात आणले जात आहे. ज्या लोकांनी आपली घरे, फार्म हाऊस आणि रिसॉर्टमध्ये जास्त कुत्रे पाळले आहेत, त्यांना अधिक त्रास होत आहे. टायगर हिल येथील रहिवासी अनुप भारद्वाज यांच्या तीन कुत्र्यांमध्ये पार्वो विषाणू आढळून आला आहे. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला असून दोघांवर उपचार सुरू आहेत. पंचवटीतील रहिवासी डॉ.डी.पी.शुक्ला यांच्या चार कुत्र्यांचा पार्वो विषाणूमुळे मृत्यू झाला आहे.

काय आहेत लक्षणे-

डॉ.संजय जैन सांगतात की, पार्वो विषाणूची लागण झालेल्या कुत्र्यांना आधी ताप येतो. पोट आणि आतड्यांमध्ये संसर्ग पसरल्यामुळे खाणं-पिणं बंद होतं. कुत्र्यांना वारंवार उलट्या आणि जुलाब होतात. उलटीमध्येही रक्त येते. रूग्णालयात इतर आजार असणाऱ्या कुत्र्यांवर स्वतंत्र ठिकाणी उपचार करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT