Mamata_Banerjee
Mamata_Banerjee 
देश

निवडणुका आल्या, घोषणा सुरु; ममता बॅनर्जींकडून विद्यार्थ्यांना मोफत टॅब

सकाळन्यूजनेटवर्क

कोलकता- सरकारी व अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ, अल्प दरात कोरोनाची ‘आरसी-पीसीआर’ चाचणी असे निर्णय मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी (ता. ३) घेतले.

पश्‍चिम बंगालमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. त्यावर एक भाग म्हणजे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हे निर्णय घेतल्याचे मानले जात आहे. कोरोनामुळे ऑनलाइन शिक्षणावर भर देण्यात येत आहे. पण अनेक विद्यार्थी या शिक्षणाला मुकत आहे. म्हणूनच सरकारी व अनुदानित शाळा व मदरशामध्ये बारावीत शिकणाऱ्या सुमारे साडेनऊ लाख विद्यार्थ्यांना मोफत टॅब देण्यात येणार आहेत. ऑनलाइन शिक्षण घेणाऱ्या माध्यमिक गटातील सर्व विद्यार्थ्यांना संगणकही पुरविले जातील, अशी माहिती ममता बॅनर्जी यांनी दिली. राज्यात ३६ हजार सरकारी व अनुदानित माध्यमिक शाळा आहेत तर १४ हजार उच्च माध्यमिक शाळा आहेत. मदरशांची संख्या सुमारे ६३६ आहे.

VIDEO: MLC निवडणुकीतील पराभवाने भाजप नेत्यांचा राग अनावर; पोलिसांना केली मारहाण

महागाई भत्त्यात वाढ

बॅनर्जी यांनी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यातही (डीए) ३ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील दहा लाख कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार असून यासाठी बावीसशे कोटी रुपयांचा बोजा राज्याच्या सरकारी तिजोरीवर पडणार आहे. हा निर्णयाची अंमलबजावणी १ जानेवारी २०२१ पासून होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs DC Live Score: चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात अडकले दिल्लीचे धुरंधर, पण कुलदीपच्या फिनिशिंग टचमुळे कोलकातासमोर 154 धावांचं लक्ष्य

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Govinda Dance: गोविंदानं डान्स करुन केला धैर्यशील मानेंचा प्रचार; व्हिडिओ पाहा

Viral Video: गिल लावत होता फिल्डिंग अन् विराटने अचानक येऊन दिला जोरात धक्का, GT vs RCB सामन्यावेळी काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : देशाला हुकुमशाहा सरकारची गरज नाही; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT