American Airlines 
देश

American Airlines : आता अमेरिकन एयरलाइन्सच्या विमानात सहप्रवाशावर लघवी केल्याची घटना; आरोपी अटकेत

रवींद्र देशमुख

नवी दिल्ली - अमेरिकन एअरलाइन्सच्या फ्लाइटमध्ये न्यूयॉर्कहून दिल्लीला येत असलेल्या एका भारतीय नागरिकाला सहप्रवाशाच्या अंगावर लघवी केल्याच्या आरोपाखाली दिल्ली विमानतळावर पकडले आहे. अधिकृत सूत्रांनी सोमवारी (२४ एप्रिल) ही माहिती दिली. एअरलाइन्स कर्मचार्‍यांनी सांगितले की, आरोपी प्रवासी दारूच्या नशेत होता. वाद झाल्यानंतर त्याने सहप्रवाशावर लघवी केली.

ही घटना अमेरिकन एअरलाइन्सच्या फ्लाइट AA 292 मध्ये घडली. आरोपी प्रवाशाला रविवारी रात्री 9 वाजता इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय (IGI) विमानतळावर उतरल्यानंतर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (CISF) पकडले. विमान कंपन्यांनी लँडिंगपूर्वी दिल्ली विमानतळाला ही बाब कळवली आणि या प्रकरणातील दोन्ही प्रवाशांना नंतर दिल्ली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

सूत्रांनी पीटीआयला सांगितले की, पीडित प्रवाशाने औपचारिक तक्रार दाखल केली आहे. नागरी विमान वाहतूक कायद्यांतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात आल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले. विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी प्रवाशांच्या बेशिस्त वर्तनाची तक्रार दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

अमेरिकन एअरलाइन्सने सांगितले की, विमानातील घटनेबाबत एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांनी दिल्लीतील पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. अलीकडच्या काळात, मद्य प्राशन केल्यानंतर सहप्रवाशांवर लघवी केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. गेल्या वर्षी २६ नोव्हेंबरला एअर इंडियाच्या न्यूयॉर्क-दिल्ली फ्लाइटच्या बिझनेस क्लासमध्ये एका मद्यधुंद पुरुषाने ७० वर्षीय महिला सहप्रवाशावर लघवी केल्याचा आरोप केला होता..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Budget: मोफत स्टेशनरी, पदवीपर्यंत फी भरण्याची तरतूद अन्...; बीएमसीचा ₹४,२४८ कोटींचा शिक्षण अर्थसंकल्प सादर, योजना काय आहेत?

Maharashtra Government Employees: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! शासनाचा जीआर; पगार वाढला, फरकही मिळणार

कधीकधी भीती वाटते... 'आई कुठे काय करते' फेम गौरी कुलकर्णीने घेतलाय लग्नाचा निर्णय; कारण सांगत म्हणाली- आई-बाबा बीडला...

Mumbai Police Arrest 25 Bangladeshis : मुंबई पोलिसांनी सापळा रचून २५ बांगलादेशींना केली अटक ; बनावट कागदपत्रेही जप्त

Viral Video : हेलिपॅड, 100 एकरची जागा आणि भव्य फार्महाऊस ; कोई मिल गया फेम खलनायकाची प्रॉपर्टी पाहून येईल चक्कर !

SCROLL FOR NEXT