indian railways Sakal
देश

Indian Railways l रेल्वे मंत्रालयाचा मोठा निर्णय; आता प्रवास होणार स्वस्तात

रेल्वेच्या या निर्णयामुळे आता प्रवाशांना स्वस्तात प्रवास करता येणार आहे.

अर्चना बनगे

Railways Ministry Update : कोरोना (Corona)रूग्णांची संख्या कमी झाल्याने प्रवाशांनी रेल्वेने (Indian Railway) प्रवास करण्यास पसंदी दिली आहे. त्यातच आता होळीचा सण जवळ आल्याने उत्तर भारतीयांची गावी जाण्यासाठी गडबड सुरु झाली आहे. भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुविधा लक्षात घेऊन आरक्षित डबे बसवण्याचा एक मोठा निर्णय घेतला आहे.

रेल्वेच्या या निर्णयामुळे आता प्रवाशांना स्वस्तात प्रवास करता येणार आहे. हा डबा बसवल्यानंतर आता प्रवाशांना तिकीट बुक करायची गरज भासणार नाही. डायरेक्ट तिकीट काढून तुम्हाला प्रवास करता येणार आहे. देशात कोरोनाच्या संख्येत झपाट्याने वाढ झाल्यानंतर २३ मार्च २०२० पासून ट्रेनमधून आरक्षित डबे हटवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता पुन्हा हे डबे बसवल्याने प्रवाशांना माफक दरात प्रवास करता येणार आहे.

खिडकीतून तिकीट काढता येते

या निर्णयानंतर प्रवाशांना स्थानकात जाऊन खिडकीतून तिकीट काढता येणार आहे. शिवाय ही सुविधा सुरू केल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना पूर्वीप्रमाणे सवलत मिळू शकेल. आता पूर्वीपेक्षा जास्त प्रवासी याचा लाभ घेतील.

हिवाळ्यात रद्द झालेल्या गाड्याही सुरू झाल्या

वाढत्या थंडी आणि धुक्यामुळे उत्तर प्रदेश, बिहार, मध्यप्रदेश आणि झारखंडला जाणाऱ्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या. आता १ मार्चपासून या गाड्या पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे या मार्गावरील कोट्यवधी प्रवाशांना फायदा होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

IND vs ENG 2nd Test: २४ वर्षांच्या पोराचे शतक! जेमी स्मिथ-हॅरी ब्रूक्सच्या खेळीने इंग्लंडचा पलटवार; गौतम गंभीरचा फसला प्लॅन

Ulhasnagar Crime : दारू पार्टीतील किरकोळ वादातून मित्राकडून मित्राचा खून; आरोपी शकील शेखला बेड्या

Dombivali News : आमदार राजेश मोरे यांनी पलावा पुलाचे उद्घाटन केले आणि पूल बंद झाला

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

SCROLL FOR NEXT