Complaint filed against Arvind Kejriwal Mallikarjun Kharge and others for making citing caste of President Droupadi Murmu  
देश

Patna Meeting: ऐक्याच्या पहिल्याच बैठकीनंतर विरोधक विखुरले! केजरीवालांचा काँग्रेससोबत जाण्यास नकार

भाजपविरोधात ऐक्याची हाक दिल्यानंतर विरोधकांची पाटण्यात पहिलीच बैठक पार पडली.

Amit Ujagare (अमित उजागरे)

पाटणा : भाजपविरोधात ऐक्याची हाक दिल्यानंतर विरोधकांची पाटण्यात पहिलीच बैठक पार पडली. या बैठकीनंतर लगेचच विरोधकांच्या या ऐक्याला तडे गेल्याचं पहायला मिळालं आहे. आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी या बैठकीनंतर विरोधी सूर लावला आहे. यासाठी त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. (Patna Meeting after first unity meeting opposition dispersed Kejriwal refusal to go with Congress)

दिल्लीच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्तीबाबत केंद्रानं आणलेल्या अध्यादेशाला राज्यसभेत मत मिळू नयेत यासाठी आम आदमी पार्टीकडून एनडीएत नसलेल्या पक्षांकडून पाठिंबा मागितला जात आहे. पण यावर काँग्रेसनं आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळं काँग्रेसच्या मौनामुळं त्यांच्या खऱ्या हेतूबद्दल शंका आहे, असं म्हणतं काँग्रेससोबत आघाडी करणं अवघड असल्याचं केजरीवाल यांनी म्हटलं आहे. (Latest Marathi News)

खासगी चर्चांमध्ये काँग्रेसचे वरिष्ठ नेत्यांनी सूचक इशारा दिला आहे की, कदाचित काँग्रेस औपचारिक किंवा अनौपचारिकरित्या राज्यसभेत दिल्लीच्या अध्यादेशावर मतदान करणं टाळेल. पण जर काँग्रेसनं अशी भूमिका घेतली तर त्याचा फायदा भारताच्या लोकशाहीवर घाला घालणाऱ्या भाजपलाच होणार आहे, असं आपनं म्हटलं आहे.

त्याचबरोबर “आज पाटण्यात समविचारी पक्षांच्या बैठकीत अनेकांनी काँग्रेसला या अध्यादेशाचा जाहीर निषेध करण्याचं आवाहन केलं. परंतु, काँग्रेसनं तसं करण्यास नकार दिला,” असंही आपने नमूद केलं आहे. काँग्रेस सोडून ११ पक्षाच्या प्रतिनिधींनी राज्यसभेत आम्ही अध्यादेशाला विरोध करणार असल्याचं जाहीर केलं आहे.

काँग्रेस हा एक राष्ट्रीय पक्ष आहे, त्यामुळं ते देशातील जवळपास सर्व प्रश्नांवर आपली भूमिका जाहीर करतात. पण या पक्षानं दिल्लीच्या काळ्या अध्यादेशावर आद्याप आपली भूमिका जाहीर केलेली नाही. कारण दिल्ली आणि पंजाब काँग्रेसनं मोदी सरकारच्या या अध्यादेशाला पाठिंबा असल्याचं जाहीर केलं आहे. (Marathi Tajya Batmya)

जर हा अध्यादेश पारीत झाला तर हा ट्रेंड खूपच धोकादायक राहिल. कारण हे ट्रेंड इतर राज्यांमध्येही सुरु होईल, त्यामुळं लोकशाहीत निवडून आलेल्या सरकारांची शक्ती काढून घेण्याचं काम केलं जाईल. त्यामुळं काँग्रेस राज्यसभेतील आपल्या ३१ खासदारांना या काळ्या अध्यादेशाला विरोध करण्याची भूमिका जाहीर करणार नसेल तर आम आदमी पार्टीला काँग्रेससारख्या पक्षांसोबत असलेल्या पक्षांसोबत जाणं कठीण असेल, असंही आपनं म्हटलं आहे.

दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हटलं आहे की, पावसाळी अधिवेशन सुरु होण्यापूर्वी या मुद्दावर काँग्रेसकडून आपली भूमिका स्पष्ट केली जाईल. विरोधकांपैकी १८ ते २० पक्ष या मुद्द्यावर सोबत आहेत की देशातील कुठल्या मुद्द्यांना विरोध करायचा आणि कुठल्या मुद्द्यांना पाठिंबा द्यायचा, त्यामुळं संसदेच अधिवेशन सुरु होण्यापूर्वीच याबाबत निर्णय घेतला जाईल, असंही खर्गे यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT