pune sakal
देश

२०० कुत्रे-मांजरासह पॉलची घरवापसी

माजी नौदल अधिकाऱ्याचे प्राणीप्रेम; ब्रिटिश संरक्षणमंत्र्याची नाराजी

सकाळ न्यूज नेटवर्क / पीटीआय

लंडन : तालिबानच्या तावडीतून सुटण्यासाठी हजारो नागरिक धडपडत असताना ब्रिटिशच्या एका माजी अधिकाऱ्याची घरवापसी चर्चेत आली आहे. हा माजी नौदल अधिकारी दहा वीस नाही तर तब्बल २०० हून अधिक कुत्रे आणि मांजर घेऊन मायदेशी परतला. या प्राण्यांसाठी त्याने जीव धोक्यात घातला. परंतु माणसाऐवजी प्राण्यांना वाचवण्यासाठी त्याने केलेल्या प्रयत्नांवरून ब्रिटनमध्ये चर्चा होत आहे. संरक्षणमंत्र्यांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे.

पॉल पेन फारथिंग यांनी पंधरा वर्षापूर्वी अफगाणिस्तानात ब्रिटिश सैनिक म्हणून सेवा बजावली. त्यानंतर ‘नाउजाद डॉग चॅरिटी’ नावाची संस्था स्थापन केली. या संस्थेच्या माध्यमातून प्राण्यासंदर्भातील उपक्रम राबवले जात होते. तालिबानने काबूलवर ताबा मिळवल्यानंतर फारथिंग यांनी मायदेशी येण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यांनी अफगाणिस्तानात पाळलेल्या प्राण्यांसह देश सोडण्यासाठी मोहीम सुरू केली. यासाठी त्यांनी सोशल मीडियाची मदत घेतली आणि मुलाखती दिल्या. फारथिंग यांच्या समर्थकांनी ब्रिटिश सरकारकडे मदत मागितली. (InterNational News)

शेवटी अफगाणिस्तानातून प्राण्यांना आणण्यासाठी ऑपरेशन आर्क असे नाव देण्यात आले. प्रत्यक्षात ते आपल्या अफगाण सहकाऱ्यांसमवेत आणि अनाथांसमवेत ब्रिटिश सैनिकांबरोबर मायदेशी येण्यास पात्र होते. परंतु त्यांनी प्राण्याशिवाय येणार नाही, असा हट्ट धरला. अर्थात ब्रिटनच्या काही खासदारांनी टीका केली आणि प्राण्याऐवजी नागरिकांना वाचवणे गरजेचे होते, असे मत मांडले गेले. संरक्षण मंत्री बेन वॉलेस यांनी म्हटले की, सैनिकांनी प्राण्यांऐवजी नागरिकांना प्राधान्य द्यायला हवे होते. तसेच अभियानादरम्यान फारथिंग यांच्या समर्थकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा अधिक वेळ घेतला आणि सैनिकांविरोधात अपशब्द काढल्याचाही आरोप वॉलेस यांनी केला. परंतु फारथिंग यांनी आरोपाचा इन्कार केला असून कोणत्याही अधिकाऱ्याची मदत घेतली नसल्याचा दावा केला. फारथिंग यांनी अफगाणिस्तानच्या नागरिकांना काबूलमध्येच ठेवले आहे. वैयक्तिकरित्या भाड्याने घेतलेल्या चार्टर प्लेनने पॉल पेन फाथरिंग हे प्राण्यांसह शनिवारी काबूलहून लंडनकडे रवाना झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario : पंजाब किंग्सचा सलग पाचवा पराभव! मुंबई इंडियन्सने सर्व गणित बिघडवले; CSK, RR यांना दिली आयती संधी

Gold Import: सोने आयात करणाऱ्यांसाठी मोठा धक्का! ड्युटी-फ्री गोल्डसाठी नवे कडक नियम लागू; प्रति परवान्यावर मर्यादा निश्चित

Anand Paranjape : माझ्यात शिवसेनेचाच डीएनए; माजी खासदार आनंद परांजपे स्वगृही

Mumbai Coastal Road Closed : मुंबई कोस्टल रोड उद्या ५ तास बंद... कसे असतील पर्यायी मार्ग, प्रवास करण्यापूर्वी नक्की वाचा

Nitin Gadkari : अक्कलकोट विधानसभेच्या आणखी दोन महत्त्वाच्या कामाला मंजुरी देण्याची गडकरींची घोषणा; विकास कामात राजकारण न करण्याचे केले आवाहन

SCROLL FOR NEXT